ETV Bharat / state

'माहेर'च्या मुलांना 'आपुलकी'ने दाखवला 'तान्हाजी' - saurabh malushte

'आपुलकी' संस्थेच्या सौरभ मलुष्टे यांनी पुढाकार घेऊन मुलांना तान्हाजी चित्रपट दाखवला. अनेक पालकांनी आपल्या मुलांना हा चित्रपट सिनेमागृहात नेऊन दाखवला. या चित्रपटाचा आनंद अनाथ मुलांनाही घेता यावा, ही संधी या संस्थेने उपलब्ध करून दिली.

tanhaji
'तान्हाजी' सिनेमा बघताना चिमुकले
author img

By

Published : Feb 3, 2020, 11:04 AM IST

रत्नागिरी - शहरातील 'माहेर' संस्थेतील अनाथ, निराधार मुलांनी शनिवारी सध्या देशभर गाजत असलेला 'तान्हाजी' चित्रपट प्रत्यक्ष चित्रपटगृहात जाऊन पाहिला. यामधील काही मुले यापूर्वी कधीही चित्रपटगृहात गेली नव्हती. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

'माहेर' संस्थेतील मुलांनी पाहिला 'तान्हाजी' चित्रपट

हेही वाचा - 'भारताच्या इतिहासात इंग्रजांना मोठं करण्याचा सैफ अली खानचा प्रयत्न'

'आपुलकी' संस्थेच्या सौरभ मलुष्टे यांनी पुढाकार घेऊन मुलांना हा चित्रपट दाखवला. अनेक पालकांनी आपल्या मुलांना हा चित्रपट सिनेमागृहात नेऊन दाखवला. या चित्रपटाचा आनंद अनाथ मुलांनाही घेता यावा, ही संधी या संस्थेने उपलब्ध करून दिली. या उपक्रमादरम्यान आपुलकी संस्थेचे स्वप्नील पाथरे, ब्रिजेश साळवी, पत्रकार जान्हवी पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा - 'तान्हाजी' चित्रपटात 'चुलत्या'ची भूमिका साकारणाऱ्या कैलास यांचा भोकरदनमध्ये सत्कार

अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ' तान्हाजी: द अनसंग वॉरियर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांमधील शूरवीर तानाजी मालुसरेंनी सर केलेल्या 'कोंढाणा' किल्ल्याची शौर्यगाथा 'तान्हाजी' या चित्रपटात दाखविण्यात आली आहे.

Intro:'माहेर'च्या 'त्या' मुलांना 'आपुलकी'ने दाखवला 'तान्हाजी'

रत्नागिरी, प्रतिनिधी

रत्नागिरीतल्या माहेर संस्थेतील अनाथ, निराधार मुलांनी शनिवारी सध्या देशभर गाजत असलेला 'तान्हाजी' चित्रपट प्रत्यक्ष चित्रपटगृहात जाऊन पाहिला. रत्नागिरीतल्या 'आपुलकी' या संस्थेच्या माध्यमातून या मुलांनी हा चित्रपट पाहिला. यातली काही मुलं यापूर्वी कधीही चित्रपटगृहात गेली नव्हती. त्यामुळे या मुलांनी हा चित्रपट पहावा यासाठी 'आपुलकी' संस्थेच्या सौरभ मलुष्टे यांनी पुढाकार घेतला होता.
अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ' तान्हाजी : द अनसंग वॉरियर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांमधील शूरवीर तानाजी मालुसरेंनी सर केलेल्या कोंढाणा किल्ल्याची शौर्यगाथा 'तान्हाजी' या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. अनेकांनी तानाजी मालुसरेंचं शौर्य इतिहासाच्या पुस्तकात वाचलं आहे. मात्र हे चित्रपटरुपात पाहत असताना अनेकांच्या अंगावर काटा येतो. अनेक पालकांनी आपल्या मुलांना हा चित्रपट चित्रपटगृहात नेऊन दाखवलाही. पण अनाथ, निराधार मुलांचं काय? रत्नागिरीतल्या माहेर संस्थेत अशीच अनाथ, निराधार मुलं आहेत. या मुलांनाही हा चित्रपट पाहता यावा यासाठी रत्नागिरीतील उद्योजक, सामजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे यांनी पुढाकार घेत आपल्या 'आपुलकी' संस्थेच्या माध्यमातून या मुलांना हा चित्रपट दाखविण्याचं ठरवलं. माहेर संस्थेतील अनेक मुलांनी आजवर कधीही चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहिला नव्हता. मात्र शनिवारी 'आपुलकी'च्या माध्यमातून या मुलांनी रत्नागिरीतल्या एका चित्रपटगृहात जाऊन 'तान्हाजी' हा चित्रपट पाहिला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जात होता. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ही आमच्यासाठी समाधानकारक गोष्ट असल्याची प्रतिक्रिया यावेळी मलुष्टे यांनी व्यक्त केली. यावेळी आपुलकी संस्थेचे स्वप्नील पाथरे, ब्रिजेश साळवी, पत्रकार जान्हवी पाटील आदी उपस्थित होते..

Byte - सौरभ मलुष्टे, (आपुलकी संस्था)

Body:'माहेर'च्या 'त्या' मुलांना 'आपुलकी'ने दाखवला 'तान्हाजी'Conclusion:'माहेर'च्या 'त्या' मुलांना 'आपुलकी'ने दाखवला 'तान्हाजी'
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.