ETV Bharat / state

Coronavirus : रत्नागिरीत 6 महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण - कोरोना विषाणू

आज (मंगळवारी) 103 पैकी 78 रिपोर्ट जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाले. यामध्ये एका बाळाला कोरोना असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे.

Ratnagiri
रत्नागिरीत 6 महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण
author img

By

Published : Apr 14, 2020, 12:22 PM IST

रत्नागिरी - शहरात आणखी एक कोरोना रुग्ण सापडला आहे. धक्कादायक म्हणजे 6 महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रत्नागिरीतील कोरोना रुग्णांची संख्या आता 6 वर पोहोचली आहे.

आज (मंगळवारी) 103 पैकी 78 रिपोर्ट जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाले. यामध्ये एका बाळाला कोरोना असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे.

रत्नागिरीतल्या साखरतरमध्ये एका महिलेचा रिपार्ट कोरोना पॉझेटिव्ह आला होता. त्यानंतर याच महिलेच्या घरातील आणखी एका महिलेला कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान, याच महिलांच्या घरातील एका 6 महिन्यांच्या बाळाचा कोरोना रिपोर्ट पॉझेटिव्ह आला आहे. त्यामुळे एकाच घरातील 3 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

यापूर्वी जिल्ह्यात सापडलेल्या पहिल्या कोरोना रुग्णाच्या टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर खेडमधील एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला होता. तर राजीवडा भागातील एक आणि साखरतर भागातील 2 कोरोनाबाधित रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यात आता आणखी एका बाळाला कोरोनाची लागण झाल्याने कोरोना बाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या 6 वर गेली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.