ETV Bharat / state

नाणार प्रकल्पाचे समर्थन भोवले, शिवसेना पदाधिकाऱ्याची पदावरुन उचलबांगडी

नाणार प्रकल्पाचे समर्थन करने हे एका शिवसेना पदाधिकाऱ्याला चांगलेच भोवले आहे. त्याची शिवसेना विभागप्रमुख या पदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे.

ratnagiri
शिवसेना पदाधिकाऱ्याची पदावरुन उचलबांगडी
author img

By

Published : Feb 19, 2020, 9:10 PM IST

रत्नागिरी - राजापूर तालुक्यातील शिवसेना विभागप्रमुखाला नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन चांगलेच भोवले आहे. त्यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. राजा काजवे असे या पदाधिकाऱ्याचे नाव असून, ते सागवे जिल्हा परिषद गटाचे विभागप्रमुख होते. त्यांच्या जागी कमलाकर कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अधिसूचना रद्द झालेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ शिवसेनेचे अनेक स्थानीक पदाधिकारी सध्या पुढे येत आहेत. त्यात सामना पेपरमध्ये रिफायनरीची जाहिरात आल्याने संभ्रम वाढला होता. त्यात रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणारे शिवसेना पदाधिकारी, काही शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी सिंधुदुर्गात गेले होते. मुख्यमंत्र्यांशी त्यांची भेट झाली नाही. मात्र, त्यांना देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या निवेदनात शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या सह्या होत्या. त्यामध्ये राजा काजवे यांचे नाव सुरुवातीलाच होते.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'सामना'तल्या जाहिरातीबाबत भूमिका स्पष्ट केली होती. ‘शिवसेनेचे धोरण आणि निर्णय मी ठरवतो. ते 'सामना'तून मांडले जातात. जाहिरातदार शिवसेनेची भूमिका ठरवत नाहीत, हे मी नमूद करु इच्छितो. जाहिरात आली म्हणजे शिवसेना बदलली असे होत नाही. त्यामुळे 'नाणार नाही होणार' अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली होती. दरम्यान रिफायनरीचे समर्थन करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत खासदार विनायक राऊत यांनी दिले होते. त्यानुसार पहिलीच कारवाई सागवे जिल्हा परिषद गटाचे विभागप्रमुख राजा दत्ताराम काजवे यांच्यावर करण्यात आली आहे.

हेही वाचा - इतके वर्षे दूर राहून वाया घालवली....उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

हेही वाचा - डिजिटल मीडिया व्यासपीठांमध्ये 'ईटीव्ही भारत महाराष्ट्र' ठरले अग्रगण्य!

आता काजवे यांच्या जागी कमलाकर कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कदम यांच्या नियुक्तीचे पत्र देखील जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी आज (बुधुवार) दिले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आणि रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांच्या सुचनेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, उर्वरित रिफायनरी समर्थक पदाधिकाऱ्यांचा अहवाल पक्षप्रमुखांनी मागितला असून, इतर पदाधिकाऱ्यांवरही कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.