रत्नागिरी - राज्यात महाविकासआघाडीत राष्ट्रवादीृ, काँग्रेस आणि शिवसेना सत्तेत आली आहे. तरी रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीत वेगळेच चित्र आहे. महाविकासआघाडीचे सरकार येण्यापूर्वी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीसाठी शहर विकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाला होता. त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या उमेदवाराविरूद्ध ही निवडणूक लढणार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
हेही वाचा - आरे कारशेडच्या कामाला स्थगिती; मुख्यमंत्री ठाकरेंची मोठी घोषणा
'ही पोटनिवडणूक शिवसेनेने शहरवासियांवर पुन्हा लादली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात काहीही होवो, पण रत्नागिरीत ते शक्य नाही. येथे राष्ट्रवादी, काँग्रेस, बसपा, मनसे, आरपीआय या मित्रपक्षांच्यावतीने या निवडणुकीसाठी मिलींद कीर हेच उमेदवार राहतील', असेही शेट्ये म्हणाले.
हेही वाचा - भारताचा जीडीपी ४.५ टक्क्यांवर घसरला, ६ वर्षांतील सर्वात निचांकी स्तरावर
यावेळी शहरविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि माजी नगराध्यक्ष मिलींद कीर यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. शहरविकास आघाडीतर्फे सहा महिन्यांपूर्वीच आपली उमेदवारी निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे मित्रपक्षांनी पाठिंबा दर्शवल्याचे कीर यांनी सांगितले. या पाठिंब्याच्या जोरावर शहरात आगामी काळात चांगले काम करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचेही कीर म्हणाले.
हेही वाचा - संतापजनक! एक लीटर दूधात बादलीभर पाणी मिसळून दिले 81 मुलांना, माध्यान्ह भोजनावेळचा प्रकार
आपण नगराध्यक्ष पदाच्या सव्वा वर्षाच्या कारकीर्दीत शहरासाठी पुढील २५ वर्षांचे व्हिजन ठेवले. सुजल निर्मलमधून नळपाणी योजनेला पैसे मंजूर करून घेतले. पण आताच्या सेनेच्या सत्ताधाऱ्यांनी शहर विकासासाठी सन २०१४-१९ या काळात एकही प्रस्ताव पाठविलेला नसल्याचे कीर यांनी यावेळी सांगितले. या लादलेल्या पोटनिवडणुकीचे स्वागत नाही, पण चुकीचा पायंडा रचला जात आहे. सत्ताधारी शिवसेनेच्या मनमानीला या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून शहरवासियच उत्तर देतील, असेही कीर यावेळी म्हणाले.