ETV Bharat / state

Prasad Lad Criticizes Sanjay Raut : संजय राऊतांची मनोवृत्ती बिघडलेली; प्रसाद लाडांची टीका - प्रसाद लाड रत्नागिरी

संजय राऊत यांची मनोवृत्ती बिघडलेली आहे. त्यांना गेट वेल सून असे सांगावं लागेल, अशी टीका लाड यांनी राऊतांवर केली ( Prasad Lad Criticizes Sanjay Raut ) आहे.

Prasad Lad
Prasad Lad
author img

By

Published : Apr 7, 2022, 10:44 PM IST

रत्नागिरी - शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांत ( INS Vikrant ) वरुन भाजपा नेते किरीट सोमैयांवर आरोप केले ( Sanjay Raut Allegation Kirit Somaiya ) आहे. त्यावरुन राजकारण पेटले आहेत. त्यातच आता भाजपा नेते प्रसाद लाड यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला आहे. संजय राऊत यांची मनोवृत्ती बिघडलेली आहे. त्यांना गेट वेल सून असे सांगावं लागेल, अशी टीका लाड यांनी राऊतांवर केली ( Prasad Lad Criticizes Sanjay Raut ) आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते.

प्रसाद लाड म्हणाले की, राऊत आरोप करताहेत त्यामध्ये कुठलेही तथ्य नाही. स्वतः किरीट सोमैयांनी सांगितलं आहे, जर कुठले आरोप असतील तर खुद्द मुख्यमंत्र्यांना कागदपत्रे द्या आणि माझ्यावर कारवाई करा. पण, सोमैयांना फसवण्यासाठी काहीतरी षढयंत्र करण्याचे काम हे राऊत आणि गॅंग करत आहे. त्यामुळे त्यांना आम्ही घाबरत नाही आणि भिकही घालत नाही. राऊत यांना जे करायचं आहे ते त्यांनी करावे, न्यायालयावर आमचा विश्वास आहे. न्यायदेवता आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे.

प्रसाद लाड प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

तपास यंत्रणांचा सरोमिरा कधीही न संपणारा - भाजपात आलेल्या कृपाशंकर सिंह किंवा अन्य नेत्यांवरील केंद्रीय यंत्रणांच्या कारवाई थांबल्या का याबाबत लाड यांना विचारले. त्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, तपास यंत्रणांचा ससेमिरा हा कधीही न संपणारा असतो. एखाद्या नेत्यावरची कारवाई थांबली असे तुम्हाला कोणी सांगितलं असेल, तर तशी कारवाई थांबत नसते. केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई ही 25 - 30 वर्ष सुद्धा चालते. त्याची फाईल न्यायालयातूनच बंद होत असते. त्यामुळे ज्या कोणावर कारवाई झालीय त्यांची कागदपत्रे तापस यंत्रणा ही कायम सुरूच राहते. मुंबईचे पोलीस आयुक्त यांना आमच्यावरील कारवाईसाठी लिस्ट दिली गेली, असा आरोपही लाड यांनी केला आहे.

नाणार रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी समृद्धी महामार्गासाठी विरोध केला आणि उद्घाटनासाठी टिंगा मिरवत आहेत. तशाच पद्धतीने एखाद्या प्रकल्पाला विरोध करायचा आणि मग आपल्या लोकांची साटेलोटी त्या ठिकाणी लावायची. नंतर मग त्याला परवानगी द्यायची ही पद्धत त्यांची राहिलेली आहे. त्यामुळे आता रिफायनरीसाठी जो जमीन खरेदीचा विषय समोर आलेला आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे. जमीन खरेदी, कुणी किती रूपयांना खरेदी केली याच्या चौकशीची करावी. पण, नाणार रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे, असेही लाड यावेळी म्हणाले.

पवार साहेब जेष्ठ नेते - शरद पवार यांनी घेतलेल्या पंतप्रधानांच्या भेटीकडे एवढे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता नाही. भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर कधीही जाणार नाही. पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत. ते पंतप्रधानांना भेटू शकतात. सध्या राज्यात होत असलेली कारवाई, संजय राऊत यांच्यावरील कारवाई किंवा राज्यातील इतर प्रश्नांवर ही भेट झालेली असू शकते, अशी प्रतिक्रिया लाड यांनी दिली आहे.

हेही वाचा - MNS Vasant More : 'कोणत्याही पक्षात जाणार नाही', शहराध्यक्ष पदावरुन हटवल्यानंतर वसंत मोरेंची प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.