ETV Bharat / state

शिवसेनेचे सहदेव बेटकर राष्ट्रवादीच्या वाटेवर, तटकरेंची घेतली भेट - काँग्रेस

जिल्हा परिषदेतील शिक्षण सभापती शिवसेनेचे सहदेव बेटकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार सुनील तटकरे यांची चिपळूण तालुक्यातील मांडकी-पालवण येथे भेट घेतली. भास्कर जाधव शिवसेनेत आल्यामुळे बेटकर यांच्या उमेदवारीबाबत प्रश्न उपस्थित झाल्यामुळे ते राष्ट्रवादीतून गुहागरमधून निवडणूक लढविण्याची चर्चा सुरू आहे.

सुनिल तटकरेंची भेट घेताना सहदेव बेटकर
author img

By

Published : Sep 28, 2019, 9:43 PM IST

रत्नागिरी - जिल्हा परिषदेतील शिक्षण सभापती शिवसेनेचे सहदेव बेटकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार सुनील तटकरे यांची चिपळूण तालुक्यातील मांडकी-पालवण येथे भेट घेतली. त्यामुळे बेटकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे म्हटले जात आहे. ते गुहागरमधून राष्ट्रवादीकडून विधानसभेची निवडणूक लढवतील, अशीही चर्चा सध्या सुरू आहे.

सुनिल तटकरेंची भेट घेताना सहदेव बेटकर

सहदेव बेटकर हे गुहागर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. पक्षाच्या वरिष्ठांनी आपल्याला तयारीला लागण्यासही सांगितल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, भास्कर जाधव शिवसेनेत आल्यामुळे बेटकर यांचे नाव चर्चेतून मागे पडले. शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार नसल्याचे संकेत मिळाल्यानंतर बेटकर यांची अलीकडे राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक वाढली आहे. मागील आठवड्यात बेटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी बेटकर यांनी मांडकी पालवण येथे खा. सुनील तटकरे यांची भेट घेतली. या भेटीत गुहागर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. त्यामुळे बेटकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस या मतदारसंघातून उमेदवारी देणार का? याचीच चर्चा सध्या जिल्ह्यात आहे.

हेही वाचा - लोकांनी आता ठरवलंय - खासदार सुनिल तटकरे

दरम्यान, बेटकर यांच्या तटकरे भेटीने शिवसेनेत खळबळ उडाली आहे. त्यामुळे शिवसेना आता बेटकर यांच्याबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, आजच्या या भेटीने बेटकर राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चेला जोर आला आहे.

Intro:शिवसेनेचे सहदेव बेटकर राष्ट्रवादीच्या वाटेवर

सहदेव बेटकरांनी घेतली तटकरेंंची भेट

गुहागरमधून उमेदवारीसाठी बेटकरांचे प्रयत्न

रत्नागिरी- प्रतिनिधी

जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विद्यमान खासदार सुनील तटकरे यांची चिपळूण तालुक्यातील मांडकी-पालवण येथे भेट घेतली. त्यामुळे बेटकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं म्हटलं जातं आहे, ते गुहागरमधून राष्ट्रवादीकडून विधानसभेची निवडणूक लढवतील अशीही चर्चा सध्या सुरू आहे.
सहदेव बेटकर हे गुहागर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. पक्षाच्या वरिष्ठांनी आपल्याला तयारीला लागण्यासही सांगितल्याचं त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान भास्कर जाधव शिवसेनेत आल्यामुळे बेटकर यांचं नाव चर्चेतून मागे पडलं. शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार नसल्याचे संकेत मिळाल्यानंतर बेटकर यांची अलीकडे राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक वाढली आहे. मागील आठवड्यात बेटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी बेटकर यांनी मांडकी पालवण येथे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांची भेट घेतली. या भेटीत गुहागर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. त्यामुळे बेटकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस या मतदारसंघातून उमेदवारी देणार का? याचीच चर्चा सध्या जिल्ह्यात आहे.
दरम्यान बेटकर यांच्या तटकरे भेटीने शिवसेनेत खळबळ उडाली आहे.
त्यामुळे शिवसेना आता बेटकर यांच्याबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. मात्र आजच्या या भेटीने बेटकर राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चेला जोर आला आहे..
Body:शिवसेनेचे सहदेव बेटकर राष्ट्रवादीच्या वाटेवर

सहदेव बेटकरांनी घेतली तटकरेंंची भेट

गुहागरमधून उमेदवारीसाठी बेटकरांचे प्रयत्नConclusion:शिवसेनेचे सहदेव बेटकर राष्ट्रवादीच्या वाटेवर

सहदेव बेटकरांनी घेतली तटकरेंंची भेट

गुहागरमधून उमेदवारीसाठी बेटकरांचे प्रयत्न
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.