रत्नागिरी - कोरेगाव-भीमा प्रकरणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी आयोगासमोर उलट तपासणी करा ही कर्मवीर प्रतिष्ठानच्या अध्यक्षानी मागणी केली आहे. या मागणीला साष्ट्रवादी काँग्रेसने समर्थन दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चौकशी व्हायला काही हरकत नाही, असे मत व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी फडणवीस जर निर्दोष आहेत, तर त्यांनी घाबरू नये त्यांनी चौकशीला सामोर जावे, असे खुले आव्हान दिले.
औरंगाबादच्या पंकजा मुंडे यांच्या उपोषणावेळी हातात बुट घेवून मुलाखत देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनाही रुपाली चाकणकर यांनी टोला लगावला. खरं तर त्यांना स्वतःच्या लोकांमध्येच बसल्यावर भीती वाटत होती की काय बूट चोरीला जाण्याची, की चोरांच्या टोळीत बसलोय की काय असे वाटावे, अशा अविर्भाव ते होते. मात्र, लोकांसमोर भूमिका मांडत असताना आपली जबाबदारी काय हेही त्यांनी पाहवे, असा टोला रूपाली चाकणकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.