रत्नागिरी - शिवसेना नेते रामदास कदम ( Shivsena Leader Ramdas Kadam ) आणि परिवहन मंत्री अनिल परब ( Minister Anil Parab ) वादात नवीन ट्टिस्ट पहायला मिळत आहे. किरीट सोमैया ( BJP Leader Kirit Somaiya) यांना दापोलीतील साई रिसाॅर्टच्या ( Anil Parab Dapoli Resort ) अनधिकृत बांधकामासंदर्भातील कागदपत्रे इतर कुणी नव्हे तर आपण पुरवली, असा दावा दापोलीतील आरटीआय कार्यकर्ते रिझवान काझी ( RTI Activist Rizwan Kazi PC ) यांनी केला आहे. माहितीच्या अधिकारात मागवलेल्या कागदपत्रांसोबत आरटीआय कार्यकर्ते रिझवाना काझी यांनी हा गोप्यस्फोट केला आहे. दापोलीत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली.
- काय म्हणाले रिझवाना काझी? -
१७ मार्च २०१७ पासून अनेक कार्यालयामध्ये वादग्रस्त साई रिसाॅर्ट संदर्भात माहितीच्या अधिकारात माहिती मागवली. मिळालेली माहिती आपण किरीट सोमैया यांना पुरवली. त्याचे दाखले आरटीआाय कार्यकर्ते रिझवान काझी यांनी दिले आहेत. तर दापोलीतील आरटीआय कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांना आपणच भाजपा नेते किरीट सोमैया यांचा मोबाईल नंबर दिल्याचे पुरावे त्यांनी सादर केले. शिवसेना नेते रामदास कदम आणि दापोलीतील आरटीआय कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांच्यातील संभाषण व्हायरल झाले होते.
- 'लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार' -
शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मुंबईतल्या खळबळजनक पत्रकार परिषदेनंतर दापोलीतील आरटीआय कार्यकर्ते रिझवान काझी पुढे आलेत. वादग्रस्त साई रिसाॅर्ट प्रकरणात किरीट सोमैया यांना रामदास कदम यांनी रसद पुरवल्याचा आरोप झाले होते. काल शिवसेना नेते रामदास कदम यांनी हे आरोप फेटाळल्यानंतर आता हे प्रकरण उकरून काढणारे आरटीआय कार्यकर्ते समोर आलेत. रिझवान काझी यांनी मुरुड येथील वादग्रस्त साई रिसाॅर्ट प्रकरणात पहिल्यांदा माहितीचा अधिकार टाकल्याचा दावा केला आहे. त्याचे कागदोपत्री पुरावे देत वादग्रस्त साई रिसाॅर्ट प्रकरण मागे राहिलंय आणि राजकारण खेळलं जात असल्याची खंत आरटीआय कार्यकर्ते रिझवान काझी यांनी व्यक्त केली आहे. किरीट सोमैया यांना माहितीच्या अधिकारात माहिती मिळाल्यानंतर आपण या प्रकरणातील सर्व माहिती भाजप नेते किरीट सोमैया यांना पुरवल्याचा दावा रिझवान काझी यांनी केला आहे. वादग्रस्त साई रिसाॅर्ट प्रकरणातील माहितीच्या अधिकारात मिळालेली कागदपत्र घेऊन आपण मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती काझी यांनी दिली.
- काल कदमांनी घेतली होती पत्रकार परिषद -
शिवसेना नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेतील काही नेते जाणून-बुजून विरोधात कट कारस्थान करत आहेत, असे सांगत मंत्री अनिल परब हे गद्दार असून शिवसेना या गद्दारांना कसे खपवून घेते, असा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच मंत्री अनिल परब हे शिवसेना संपवायचे काम करत आहेत, असा आरोपही रामदास कदम यांनी केला होता.
हेही वाचा - Kadam Vs Parab : गद्दार कोण मी.. की अनिल परब? रामदास कदम यांचा सवाल