ETV Bharat / state

लॉकडाउनचा फटका, रत्नागिरी नगरपालिकेच्या घरपट्टी वसुलीत घट - real estate recovery reduced in ratnagiri

कोरोना महामारीचे मोठे संकट देशावर आले. त्यामुळे देशात पाच टप्प्यात लॉकडाउन करण्यात आला. सुमारे अडीच महिने लॉकडाउनमध्ये गेल्याने रत्नागिरी नगरपालिकेच्या घरपट्टी वसुलीवर याचा मोठा परिणाम झाला. १४ कोटी १५ लाखांपैकी ५ कोटी ९९ लाखच वसूल झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत घरपट्टी वसुली घसरली आहे.

Ratnagiri municipality
Ratnagiri municipality
author img

By

Published : Feb 17, 2021, 8:23 AM IST

रत्नागिरी - घरपट्टीच्या माध्यमातून कोट्यवधीचा महसुल रत्नागिरी नगरपालिकेला मिळतो. मात्र लॉकडाउनमुळे यावर्षी घरपट्टी वसुलीचा टक्का गतवर्षीच्या तुलनेत घसरला आहे. १४ कोटी १५ लाख वसुलीचे उद्दीष्ट पालिकेसमोर होते. परंतु केवळ ५ कोटी ९९ लाख रुपये वसूली झाली आहे.

शहरात सुमारे २७ हजार ७२९ इमलेधारक आहेत. पालिकेकडून विविध करांसह दरवर्षी घरपट्टी वसूल केली जाते. घराच्या स्क्वेअर फुटावर पालिका मालमत्ता विभागाचे कर्मचारी सर्व्हे करून घरपट्टी निश्चित करतात. त्यानुसार गेल्यावर्षी २०१८-१९ मध्ये ९ कोटी ८९ लाख रुपये घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ६ कोटी ४१ लाख वसूल झाले होते. सुमारे ८०.११ टक्के वसुली झाली होती. अनेक इमलेधारकांनी घरपट्टी थकविली आहे. त्यांच्यावर पालिकेने कारवाई केली आहे. काही थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध केली होती. काहींच्या घराला सील ठोकली होती. गेल्यावर्षीची थकबाकी आणि यंदाची घरपट्टी धरून १४ कोटी १५ लाखाची वसुलीचे उद्दिष्ट पालिकेसमोर आहे.

कोरोना महामारीचे मोठे संकट देशावर आले. त्यामुळे देशात पाच टप्प्यात लॉकडाउन करण्यात आला. सुमारे अडीच महिने लॉकडाउनमध्ये गेल्याने पालिकेच्या घरपट्टी वसुलीवर याचा मोठा परिणाम झाला. १४ कोटी १५ लाखांपैकी ५ कोटी ९९ लाखच वसूल झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत घरपट्टी वसुली घसरली आहे. शासनाने सर्वांनाच सवलत दिल्याने पालिका वसुलीसाठी सक्तीही करू शकत नसल्याने पालिका आर्थिक अडचणीत सापडली आहे.

हेही वाचा - शाब्बाश बापू..! अक्षर पटेलच्या 'पंच'मुळे मोठ्या विक्रमाची नोंद

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.