ETV Bharat / state

रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाकडून फूटपाथवरील अनधिकृत टपऱ्या हटविण्यास सुरुवात

author img

By

Published : Dec 1, 2020, 7:40 PM IST

रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाकडून फूटपाथवरील अनधिकृत टपऱ्या हटविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याबाबत परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीत ठराव झाला होता.

रत्नागिरीत अनधिकृत टपऱ्या हटविण्यास सुरुवात

रत्नागिरी - नगर परिषदेच्या नुकतीच सर्वसाधारण बैठक पार पडली. बैठकीमध्ये सर्व नगरसेवकांच्या सर्वानुमते फूटपाथ व रस्त्यावरील अनधिकृत टपऱ्या व गाळे हटविण्याबाबत ठराव झाला होता. आरोग्य सभापती राजन शेट्ये यांनी प्रथम प्रस्ताव मांडला होता. या ठरावानुसार मंगळवारपासून रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाने अनधिकृत गाळे, टपऱ्या हटविण्यास सुरुवात केली.

अनधिकृत गाळे, टपऱ्यांंवर कारवाई-

मंगळवारी सकाळपासून मारुती मंदिर, आरोग्य मंदिर या भागातील फूटपाथवर असणारे चायनीज सेंटर, मोबाईल मार्केटिंगचे स्टॉल, फूटपाथवरील टपऱ्या हटविण्यास सुरुवात झाली. नगर परिषदेत सर्वानुमते ठराव झाल्यानंतर कारवाई करण्याबाबत अनधिकृत टपऱ्या धारकांना सूचना देण्यात आल्या होत्या.

मात्र सूचना देऊन देखील टपऱ्या स्वत:हून हटविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे मंगळवार पासून प्रशासनाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या पथकामध्ये सहायक मालमत्ता पर्यवेक्षक नंदकुमार पाटील, मालमत्ता लिपिक किरण मोहिते, विद्युत विभागाचे लिपिक जितू विचारे यांच्यासमवेत नगर परिषद कर्मचारी यांचा समावेश होता.

जेष्ठ नागरिकांना त्रास होतोय म्हणून कारवाई - बंड्या साळवी

फुटपाथवरून चालताना फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे त्रास होतो. अशा तक्रारी जेष्ठ नागरिकांकडून आल्याने व त्याच्याकडे जेष्ठ नगरसेवक राजन शेट्ये यांनी लक्ष वेधले. त्यामुळे आजपासून अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली. अशी माहिती नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी दिली. मात्र ज्यांचे पोट या व्यवसायावरच आहे. अशांचा देखील सहानभूतीने विचार करून त्यांची कुठे वेगळ्या ठिकाणी व्यवस्था करता येते का, याबाबत देखील विचार चालू असल्याची माहिती नगराध्यक्षांनी दिली आहे.

हेही वाचा- उस्मानाबादेत गोपनीयतेचा भंग; मतदाराने मतदान करतेवेळी व्हिडिओ केला तयार

हेही वाचा- अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा शिवसेनेत प्रवेश; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.