ETV Bharat / state

कीटकनाशकांवरील बंदीवर आंबा बागायतदारांच्या संमिश्र प्रतिक्रिया - आंबा निर्यात

ज्याअर्थी सरकार या कीटकनाशकांवर बंदी आणण्याचा विचार करतेय, त्याअर्थी या कीटकनाशकांचे काही साइड-इफेक्ट्स असू शकतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा स्वीकार करायला पाहिजे, असाही एक विचार आंबा बागायतदार व्यक्त करताना दिसतात.

pesticide ban
किटकनाशकांवरील बंदीवर आंबा बागाईतदारांच्या संमिश्र प्रतिक्रिया
author img

By

Published : Jun 9, 2020, 1:13 PM IST

Updated : Jun 9, 2020, 2:38 PM IST

रत्नागिरी - केंद्र सरकारने 27 कीटकनाशकांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडला असून त्यावर 45 दिवसांत सूचना मागवल्या आहेत. शेतकऱ्यांमध्ये मात्र याबाबत चलबिचल आहे. कारण यातील अनेक कीटकनाशके शेतकरी वापरत असतात. आंबा उत्पादक शेतकरी देखील यातील 8 ते 10 कीटकनाशके वापरतात. तसेच सध्या वापरात असलेली कीटकनाशके शेतकऱ्यांच्या आवाक्यातील आहेत, मात्र ही कीटकनाशके बंद झाली तर शेतकऱ्यांना जास्त किमतीची कीटकनाशके घ्यावी लागतील. त्यामुळे पर्यायाने त्याचा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना बसेल. मात्र ज्याअर्थी सरकार या कीटकनाशकांवर बंदी आणण्याचा विचार करतेय, त्याअर्थी या कीटकनाशकांचे काही साईड-इफेक्ट्स असू शकतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा स्वीकार करायला पाहिजे, असाही एक विचार आंबा बागायतदार व्यक्त करताना दिसतात.

सध्या आंबा बागायदार वापरत असलेली कीटकनाशके ही भारतात तयार होणारी आणि स्वस्तात मिळणारी जेनरिक कीटकनाशके आहेत. त्यांच्या किमतीही इथल्या शेतकऱ्यांच्या आवाक्यात आहेत. यातील क्यूनालफॉस हे कीटकनाशक आंब्यावरील किडीसाठी वापरतात, हे कीटकनाशक 400 रुपये लिटर आहे. कार्बेन्डाजिम पावडर ही आंब्यावरील बुरशी रोगासाठी वापरतात, ही 500 रुपये किलो आहे. क्लोरपायरीफॉस हे वाळवी आणि किडीसाठी वापरतात, हे कीटकनाशक 400 रुपये लिटर आहे. फेनाक्यूकार्ब हे आंब्यावरील तुटतुडा रोगासाठी वापरतात, हे 550 रुपये लिटर आहे. तर डेल्टामिथ्रीन हे किडीसाठी वापरतात. हे कीटकनाशक 600 रुपये लिटर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आंबा उत्पादक शेतकरी ही कीटकनाशके वापरत आहेत. त्याचे रिझल्ट चांगले मिळतात, त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून या कीटकनाशकांना मोठी मागणी असते, असे कोकणातील अग्रगण्य असणाऱ्या नंदाई ऍग्रोशॉपीचे मालक तसेच स्वतः एमएससी अग्रीकल्चर असलेले मोहिंदर बामणे सांगतात. तसेच या कीटकनाशकांवर बंदी आली तर शेतकऱ्यांना 2 ते 3 हजार रुपये लिटर असणारी कीटकनाशके विकत घ्यावी लागतील, त्यामुळे शेतकऱ्यांना 4 ते 5 पाचपट अधिक भुर्दंड बसेल, असेही बामणे सांगतात.

किटकनाशकांवरील बंदीवर आंबा बागाईतदारांच्या संमिश्र प्रतिक्रिया

याबाबत आंबा उत्पादक शेतकरी प्रसन्न पेठे यांना विचारले असता, आता वापरात असलेली कीटकनाशके ही शेतकऱ्यांना परवडणारी आणि रिझल्ट देणारी असल्याचे त्यांनी सांगितले. पण यातील काही कीटकनाशके आहेत, त्यांचे अंश खूप दिवस पाण्यात किंवा जमिनीत राहतात आणि अशी कीटकनाशके सरकार बंद करणार असतील तर, शेतकऱ्यांनी त्याचा स्वीकार केला पाहिजे, असे मतही पेठे यांनी व्यक्त केले. पण सरकारने सरसकट बंदी न घालता जेवढी घातक कीटकनाशके तेवढीच बंद केली पाहिजेत. ज्यांचा परिणाम माणूस किंवा जमिनीवर फार होत नाही, आशा कीटकनाशकांना या बंदीतून वगळावे, अशीही मागणी पेठे यांनी केली आहे.

आंब्यावरील कीटकनाशकांचा खर्च -

चांगली आणि योग्य प्रमाणात आंब्यावर कीटकनाशक फवारणी केली, तर साधारणतः आंबा उत्पादक शेतकऱ्याला 100 झाडांसाठी 2.25 ते 2.50 लाख रुपये खर्च येतो. काही शेतकरी एक ते दीड लाख रुपयांतही ही फवारणी करतात. पण जर व्यवस्थित कीटकनाशक फवारणी झाली तर त्याचा उत्पादन वाढीवरही चांगला परिणाम होता. उत्पादन वाढतेच, शिवाय फळही दर्जेदार मिळते. पण जर कीटकनाशक फवारणीच केली नाही तर, त्याचा उत्पादनावरही परिणाम होतो. जिथे 500 पेटी आंबा मिळायचा तिथे फक्त 200 ते 250 पेटी आंबाच मिळतो. म्हणजे जवळपास 50 टक्के उत्पादनावर फरक पडतो, मात्र त्यातही आशा बऱ्याच आंब्यावर काळे डाग असतात. त्यामुळे त्याचा दर्जा घसरतो. साहजिकच त्याचा आर्थिक बाबीवर परिणाम होत असल्याचं शेतकरी सांगतात.

आंब्याची निर्यात प्रामुख्याने मुंबईतून होते. दरवर्षी साधारणतः भारतातून 38 ते 40 हजार मेट्रिक टन आंब्याची निर्यात होत असते, यामध्ये हापूसचा वाटा 15 ते 20 टक्के आहे. म्हणजेच जवळपास 7 ते 8 हजार मेट्रिक टन एवढी हापूसची निर्यात होत असते. मध्यपूर्वेतील देश त्याचबरोबर इंग्लंड तसेच युरोप खंडातील देश अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, साऊथ कोरिया, जपान या देशांमध्ये आंब्याची निर्यात होते. पण प्रामुख्याने मध्य पूर्व देशांमध्ये आंब्याची निर्यात मोठ्या प्रमाणावर होते. यावर्षी मात्र कोरोनाचे ग्रहण आंबा निर्यातीलाही लागले आहे. हवाई वाहतूक गेले 2 महिने पूर्णतः बंद आहे. त्यामुळे हवाईमार्गे ज्या देशांमध्ये आंबा निर्यात व्हायचा, त्या देशांमध्ये यावर्षी आंबा निर्यात होऊ शकला नाही. त्यामुळे यावर्षी जी निर्यात झाली ती मध्यपूर्व देश तसेच युरोपमध्ये समुद्रमार्गे झाली.

गेल्यावर्षी 1 एप्रिल ते 19 मे या कालावधीत महाराष्ट्रातून आंब्याची निर्यात 16,746 मे. टन झालेली होती. यावर्षीचा विचार केला तर 1 एप्रिल ते 19 मे 2020 या कालावधीत 8,640 मे. टन आंब्याची निर्यात झालेली आहे. आंबा निर्यात जरी गेल्या वर्षीच्या तुलनेत 52% झालेली असली, तरी या निर्यातीत हापूसचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. कारण गेल्यावर्षी मुंबईमधून जो आंबा निर्यात झाला त्यामध्ये हापूस व्यक्तिरिक्त केसर, वेंगनपल्ली, तोतापुरी, बदामी या इतर राज्यांमध्ये उत्पादित झालेल्या आंब्याचा सुद्धा समावेश होता. पण यावर्षी मुंबईतून आंब्याची जी निर्यात झाली ती प्रामुख्याने हापूसचीच झाली आहे. कारण यावर्षी इतर राज्यांमधून आंबा मुंबईत पोहोचण्यात अडचणी येत होत्या. लॉकडाऊनमुळे राज्यांच्या सीमा बंद होत्या. बाजार समित्याही बंद होत्या. त्यामुळे निर्यातदारांना इतर राज्यातील आंबा सहज उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे यावर्षी मुंबईतून जी निर्यात झाली त्यामध्ये हापूसचाच वाटा मोठा होता. तसेच ही निर्यात प्रामुख्याने मध्यपूर्व देशांमध्ये तसेच युरोपमध्ये सुद्धा समुद्रमार्गे झाली असल्याचेही पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे यावर्षी आंब्याची निर्यात जरी घटली असली, तरीही निर्यातीत हापूसनेच बाजी मारल्याचे दिसून येत आहे.

Last Updated : Jun 9, 2020, 2:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.