रत्नागिरी - कोल्हापूर, सांगलीमधल्या पुरग्रस्तांसाठी रत्नागिरी जिल्ह्यातूनही मदतीचे अनेक हात पुढे आले आहेत. सांगली पूरग्रस्तांसाठी चिपळूणच्या मेमेन समाजाने मदतीचा हात दिला आहे. नवीन कपडे, पाणी यास्वरुपात ही मदत पाठवण्यात आली आहे. महाड पुराच्या वेळीसुद्धा चिपळूण मेमन समाजाने रत्नागिरीतून सर्वात प्रथम मदत पाठविली होती.
पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूलचे कर्मचारी देणार एक दिवसाचा पगार -
देवरूख-साडवली येथील पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूलने पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. या स्कूलमधील सर्व कर्मचाऱ्यांकडून एक दिवसाचा पगार पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शनिवारी देवरूख शहरातून आर्थिक व वस्तूरूपातील मदतीसाठी फेरी काढण्यात आली.