रत्नागिरी - राज्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या नाढत असताना रत्नागिरी जिल्ह्यातून एक दिलासादायक बातमी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या शून्यावर आली आहे. विशेष म्हणजे ६ महिन्यांच्या बाळानेही देखील कोरोनवर यशस्वीरित्या मात केली आहे. हे बाळ कोरोनामुक्त होण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली ती आईच्या दुधाने. जिल्ह्यात 6 पैकी एका रुग्णाचा मृत्यू झाळा असून, 5 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण गुहागर तालुक्यात आढळला होता. तो विदेश प्रवास करुन आला होता. या रुगणाच्या परिसरास 20 मार्च 2020 रोजी प्रतिबंधित क्षेत्र घोषीत करण्यात आले होते. त्यावेळेपासून अहोरात्र कोरोना रोखण्यासाठी सर्वचजण कार्य करीत आहेत.
विशेष म्हणजे एका ६ महिन्यांच्या बाळाने कोरोनालर मात केली आहे. हे बाळ पूर्णतः आईच्या दुधावरच अवलंबून होतं. त्यामुळे या बाळामध्ये एक वेगळ्या प्रकारची ह्युम्यानिटी तयार झाली होती. त्यामुळे या बाळामध्ये चांगला बदल झाला आणि त्याने उपचारालाही चांगली साथ दिल्याची प्रतिक्रिया बळावर उपचार करणारे डॉ दिलीप मोरे यांनी दिली .
दरम्यान, राजीवडा येथेही एकाला कोरोनाची लागण झाली होती. तर खेडमधील एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तर साखरतर हे रत्नागिरी शहरनजीकचे गाव. या गावात एका महिलेस कोरोना झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यापाठोपाठ त्याच घरातील अन्य एका महिलेसह ६ महिन्यांच्या चिमुकल्यास देखील कोरोनाची लागन झाली होती. दरम्यान, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. रुग्णालयाचे डॉ. प्रकाश जांभुळकर यांची कोरोना उपचारासाठी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी व इतर डॉक्टर आणि नर्स यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे कोरोना रुग्णांवर योग्य उपचार होवून ते बरे झाले असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्हा कोरोनामुक्त राखणे हे सगळ्यांसमोर मोठे आव्हान आहे. त्यासाठी प्रत्येकजण कटीबद्ध आहे. याचीच प्रचिती आज या बालकाच्या डिस्चार्ज प्रसंगी आली. विशेष म्हणजे 15 दिवसांच्या उपचार व तपासणीनंतर साखरतर येथील या बालकाचा कोरोनावरील विजय हा संपूर्ण यंत्रणेचा विजय ठरला आहे.