रत्नागिरी- जिल्ह्यात शनिवारी 24 तासात कोरोनाचे 372 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या 32 हजार 444 झाली आहे . गेल्या चोवीस तासांत 12 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
372 नवे रुग्ण आढळले
शनिवारी मिळालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 372 नवे रुग्ण सापडले आहेत . पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 147 रुग्ण आरटीपीसीआर तर 225 रुग्ण अँटीजेन चाचणीत बाधित सापडले आहेत . जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 32 हजार 444 वर जाऊन पोहचली आहे . तर गेल्या 24 तासात 1356 लोकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे . यामध्ये आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 493 लोकांपैकी 346 निगेटिव्ह तर अँटीजेन टेस्ट केलेल्या 1235 पैकी 1010 निगेटिव्ह आले आहेत . गेल्या चोवीस तासांत 12 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण 1046 रूग्णांचा बळी गेला आहे. जिल्ह्यातील मृत्यूदर 3.22 % आहे .
हेही वाचा -धक्कादायक; पुणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त दयानंद सोनकांबळे यांचे कोरोनाने निधन