रत्नागिरी - नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची सध्या पोटनिवडणूक लागली आहे. मात्र, शिवसेनेने ही निवडणूक लादली असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांनी केला. जनता या निवडणुकीत शिवसेनेला जागा दाखवेल आणि भाजपचे उमेदवार अॅड. दीपक पटवर्धन यांचा 100 टक्के विजय होईल, असा विश्वास भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी केला आहे.
तर सुसंस्कृत आणि एक उच्चशिक्षित उमेदवार म्हणून जनतेने राहुल पंडित यांना नगराध्यक्ष म्हणून भरघोस मतांनी निवडून दिले. मात्र जनतेच्या आशा आकांक्षांवर पाणी फिरवत शिवसेनेने त्यांना राजीनामा द्यायला लावला. त्यामुळे जनतेचा मनात असलेला आक्रोश यावेळी मतदानातून दिसेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद किर यांनी दिली आहे.
हेही वाचा - 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये चंद्रकांत पाटलांनीच केला भ्रष्टाचार'
दरम्यान, नगराध्यक्षांच्या राजीनाम्यामुळे या पदासाठी पोटनिवडणूक लागली. यासाठी 29 डिसेंबरला मतदान होणार आहे. लगेच दुसर्या दिवशी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीत शिवसेनेकडून प्रदीप उर्फ बंडया साळवी तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष मिलिंद किर, भाजपकडून जिल्हाध्यक्ष अॅड दीपक पटवर्धन, मनसेकडून रुपेश सावंत तर मुकुंद जोशी अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.
हेही वाचा - पॅन-आधार जोडणी ३१ डिसेंबरपर्यंत बंधनकारक - प्राप्तिकर विभाग
नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी राजीनामा का दिला ?
रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी राहुल पंडित 2016 मध्ये थेट जनतेतून निवडून आले. मात्र, अडीच वर्षांचा कार्यकाल संपताच त्यांनी राजीनामा द्यावा, अशी पक्षांतर्गत तडजोड झाली होती. त्यानंतर राहुल पंडित यांनी आपल्या कार्यकाळाला 2 वर्ष होताच आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यावरून अनेक चर्चा रंगल्या. मात्र, शिवसेना नेत्यांकडून हा राजीनामा स्वीकारण्यात आला नव्हता.
लोकसभा निवडणूकीची धामधूम सुरू झाल्यावर पंडित यांच्याकडे खास जबाबदारी पक्षाकडून सोपवण्यात आली होती. या काळात कायद्यातील तरतुदीनुसार त्यांना संघटनेने तीन महिने रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 12 जानेवारी 2019 रोजी प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी प्रभारी नगराध्यक्ष पदाचा पदभार हाती घेतला. दरम्यान, तीन महिन्यांच्या सुट्टीच्या कालावधीनंतर नगराध्यक्ष राहुल पंडित हे कागदोपत्री पुन्हा हजर झाले. आणि 27 मे रोजी राहुल पंडित यांनी अखेर आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला. तेव्हापासून गटनेते प्रदीप उर्फ बंडया साळवी प्रभारी नगराध्यक्ष आहेत.