रत्नागिरी - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी शनिवारी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. या बजेटमध्ये कर रचनेमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. मात्र हे बदल फार मोठे बदल असल्याचे म्हणता येणार नाही, अशी प्रतिक्रिया रत्नागिरीतील सनदी लेखापाल वरदराज पंडित यांनी दिली. जे गुंतवणूक करत नाही. मात्र, फक्त टॅक्स भरत आहेत, अशा लोकांना या कमी झालेल्या दराचा फायदा घेता येईल, असे पंडित यांनी म्हटले आहे. तर, जे छोटे व्यावसायिक आहेत. ज्यांची वार्षिक उलाढाल 50 लाखांपेक्षा कमी आहे, अशांसाठी टॅक्समधील बदल फायदेशीर असतील, अशी प्रतिक्रिया रत्नागिरी टॅक्स असोसिएशन अध्यक्ष अभिजित बेर्डे यांनी दिली.
हेही वाचा... 'जुन्याच योजना नव्या नावाने पुढे आणणारा फसवा अर्थसंकल्प'
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी, अर्थसंकल्पात प्राप्तिकर प्रणालीतील बदल जाहीर करून सर्वसामान्य करदात्यांना दिलासा दिला. वैयक्तिक करामध्ये पाच लाखांवरील उत्पन्नावर असलेल्या करामध्ये कपात जाहीर करण्यात आली. यात पाच ते साडेसात, साडेसात ते दहा, दहा ते साडेबारा, अशा सर्व उत्पन्न गटातील करावर कपात करण्यात आली. तर 15 लाख रुपयांवर वार्षिक उत्पन्न असणाऱ्या गटाला कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. श्रीमंतांवरील वार्षिक उत्पन्नावर लागू करण्यात आलेला 30 टक्के कर कायम ठेवण्यात आला.
हेही वाचा... संरक्षण क्षेत्राचे आधुनिकीकरण, नवीन शस्त्रास्त्रांसाठी १ लाख १० हजार ७३४ कोटी