ETV Bharat / state

आमच ठरलंय... शिवसेना- भाजपचा प्रत्येकी अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री - रामदास कदम - कोकणचा विकास

आगामी विधानसभेसाठी शिवसेना- भाजपची युती मजबुत असून या संदर्भातील निर्णय लोकसभा निवडणुकीच्या वेळीच घेण्यात आला होता. दरम्यान, अजून बरीच मंडळी शिवसेना- भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती रामदास कदमांनी दिली आहे.

रामदास कदम,ramdas kadam
author img

By

Published : Sep 5, 2019, 12:00 PM IST

रत्नागिरी - लोकसभा निवडणुकीच्या वेळीच आगामी मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय अमित शाह, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिघांनी एकत्र बसून घेतलेला आहे. दोन्ही पक्षाचा अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री असेल. आमच्या वाट्याला येणाऱ्या अडीच वर्षाच्या काळामध्ये आदित्य ठाकरे हेच मुख्यमंत्री म्हणून बसतील, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

रामदास कदम यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे जहाज आता बुडू लागले आहे, आणि बुडत्या जहाजात कोणी बसायला तयार नाही. सत्ताधारी पक्षात आपण गेलो तरच आपण मतदारांना न्याय देऊ शकतो आणि निवडून येऊ शकतो याची राष्ट्रवादी काँगेसच्या अनेक आमदारांना जाणीव असल्यामुळे ते शिवसेना-भाजपत प्रवेश करत आहेत. दरम्यान, अजून काही जणांचा प्रवेश बाकी आहे. असा खुलासा रामदास कदम यांनी केला आहे. दरम्यान, भास्कर जाधव हे एक जुने जाणते नेते आहेत, कोकणच्या विकासासाठी आपण सत्ताधारी पक्षात गेलं पाहिजे याची त्यांना कल्पना आहे. त्यामुळे लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करतील, विशेषतः गणपती विसर्जनानंतर ते प्रवेश करतील असा गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत बोलताना रामदास कदम म्हणाले, 'आपण जे पेरतो तसं उगवत असतं, त्यांची सत्ता असताना त्यांनी जे पेरलं ते आता उगवत आहे. त्यांनी त्यावेळी इतर पक्ष फोडले, शिवसेना फोडली भुजबळांना फोडलं, राणेंना फोडलं असे अनेक जण फोडले, आज ते सर्व जण त्यांना सोडून चाललेत. नियती कोणाला सोडत नाही आता त्यांना हे सगळं भोगायला लागतंय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणी राहणार नाही, काँग्रेसचीही अवस्था अशीच आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप हे दोनच पक्ष पहायला मिळतील' असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शिवसेना-भाजप युती होऊ नये म्हणून काहींनी देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत. मात्र, त्यांचे हे स्वप्न साकार होणार नाही. शंभर टक्के युती भक्कम आहे, आणि एकमापी शिवसेना-भाजपचीच सत्ता येणार आणि काँग्रेस-राष्ट्रवादी नेस्तनाबूत होईल, विरोधी पक्षनेता सुद्धा आपल्याला विधानसभेमध्ये पाहायला मिळणार नाही एवढी दयनीय अवस्था काँग्रेस-राष्ट्रवादीची असेल, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे.

Intro:दोन्ही पक्षांना अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद हे लोकसभा निवडणुकीवेळीच ठरलंय - रामदास कदम

आमच्या वाट्याच्या अडीच वर्षांच्या काळात आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील - रामदास कदम

भास्कर जाधव गणपती विसर्जनानंतर शिवसेनेत प्रवेश करतील - रामदास कदम

शरद पवारांनी सत्ता असताना जे पेरलं ते आता उगवत आहे - रामदास कदम

शंभर टक्के युती भक्कम आहे, आणि एकमापी शिवसेना-भाजपचीच सत्ता येणार - रामदास कदम

भुजबळ, राणे यांना पवारांनी शिवसेनेतून फोडलं - रामदास कदम

रत्नागिरी, प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या वेळीच आगामी मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय आदरणीय अमितजी शहा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिघांनी एकत्र बसून घेतलेला आहे. दोन्ही पक्षाचा अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री असेल. आणि आमच्या वाट्याला येणाऱ्या अडीच वर्षांमध्ये काळामध्ये युवा नेते आदित्यजी ठाकरे हेच मुख्यमंत्री म्हणून बसतील असं रामदास कदम यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना म्हटलं आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचं जहाज आता बुडू लागलं आहे, आणि बुडत्या जहाजात कोणी बसायला तयार नाहीय. सत्ताधारी पक्षात आपण गेलो तरच आपण मतदारांना न्याय देऊ शकतो आणि निवडून येऊ शकतो याची राष्ट्रवादी काँगेसच्या अनेक नेते आमदारांना असल्यामुळे ते शिवसेना-भाजपात प्रवेश करत आहेत. अजून काही जणांचा प्रवेश बाकी आहे असल्याचं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी म्हटलं आहे. दरम्यान भास्कर जाधव हे एक जुने जाणते नेते आहेत, कोकणच्या विकासासाठी आपण सत्ताधारी पक्षात गेलं पाहिजे याची त्यांना कल्पना आहे. त्यामुळे लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करतील, विशेषतः गणपती विसर्जनानंतर ते प्रवेश करतील असा गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत बोलताना रामदास कदम म्हणाले की, आपण जे पेरतो तसं उगवत असतं, त्यांची सत्ता असताना त्यांनी जे पेरलं ते आता उगवत आहे. त्यांनी त्यावेळी इतर पक्ष फोडले, शिवसेना फोडली भुजबळांना फोडलं, राणेंना फोडलं असे अनेक जण फोडले आज ते सर्व जण त्यांना सोडून चाललेत. नियती कोणाला सोडत नाही आता त्यांना हे सगळं भोगायला लागतंय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणी राहणार नाही, काँग्रेसचीही अवस्था अशीच आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप हे दोनच पक्ष पहायला मिळतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान शिवसेना-भाजप युती होऊ नये म्हणून काहींनी देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत, मात्र त्यांचं काही हे स्वप्न साकार होणार नाही, शंभर टक्के युती भक्कम आहे, आणि एकमापी शिवसेना-भाजपचीच सत्ता येणार आणि काँग्रेस-राष्ट्रवादी नेस्तनाबूत होईल, विरोधी पक्षनेता सुद्धा आपल्याला विधानसभध्ये पहायला मिळणार नाही एवढी दयनीय अवस्था काँग्रेस-राष्ट्रवादीची असेल अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे. Body:दोन्ही पक्षांना अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद हे लोकसभा निवडणुकीवेळीच ठरलंय - रामदास कदम

आमच्या वाट्याच्या अडीच वर्षांच्या काळात आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील - रामदास कदम

भास्कर जाधव गणपती विसर्जनानंतर शिवसेनेत प्रवेश करतील - रामदास कदम

शरद पवारांनी सत्ता असताना जे पेरलं ते आता उगवत आहे - रामदास कदम

शंभर टक्के युती भक्कम आहे, आणि एकमापी शिवसेना-भाजपचीच सत्ता येणार - रामदास कदम

भुजबळ, राणे यांना पवारांनी शिवसेनेतून फोडलं - रामदास कदमConclusion:दोन्ही पक्षांना अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद हे लोकसभा निवडणुकीवेळीच ठरलंय - रामदास कदम

आमच्या वाट्याच्या अडीच वर्षांच्या काळात आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील - रामदास कदम

भास्कर जाधव गणपती विसर्जनानंतर शिवसेनेत प्रवेश करतील - रामदास कदम

शरद पवारांनी सत्ता असताना जे पेरलं ते आता उगवत आहे - रामदास कदम

शंभर टक्के युती भक्कम आहे, आणि एकमापी शिवसेना-भाजपचीच सत्ता येणार - रामदास कदम

भुजबळ, राणे यांना पवारांनी शिवसेनेतून फोडलं - रामदास कदम
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.