ETV Bharat / state

राजापूरमधील शेतकऱ्याच्या हापूसला मिळाली विक्रमी 1 लाख 8 हजारांची किंमत - Alphonso Mango record breaking price

शेतकऱ्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढवणारी 'मायको' ब्रँडची पहिली पेटी उद्योजक आणि सेंट अग्नेलो व्हीएनसीटी व्हेंचरच्या राजेश अथायडे यांनी 1 लाख 8 हजार रुपये अशी विक्रमी किंमत देऊन घेतली. जवळपास मागील 100 वर्षांमध्ये हापूस आंब्याच्या पेटीला इतकी मिळाली नव्हती. हा आजवरचा सर्वात मोठा विक्रम आहे...

Alphonso Mango
हापूस आंबा
author img

By

Published : Mar 8, 2021, 7:36 AM IST

रत्नागिरी - राजापूरमधील बाबू अवसरे या शेतकऱ्याच्या 5 डझन हापूस आंब्याच्या पेटीला तब्बल 1 लाख 8 हजारांचा विक्रमी किंमत मिळाली आहे. कोकणातील हापूस आंब्याला जगभरातील बाजारपेठ थेट विक्रीसाठी उपलब्ध करून देत, शेतकऱ्यांना अधिकाधिक स्वावलंबी बनवण्यासाठी 'ग्लोबल कोकण' आणि 'मायको' या देशातील पहिल्याच मँगोटेक प्लॅटफॉर्मद्वारे लिलावासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. कोकणातील 10 आंबा बागायतदारांच्या मुहूर्ताच्या आंबा पेट्यांच्या लिलावाचा कार्यक्रम अंधेरीतील मॅरिएट येथे आयोजित करण्यात आला होता. राज्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर या लिलावात सहभागी झाले होते. त्यांनी चार शेतकऱ्यांच्या मुहूर्ताच्या पेट्या प्रत्येकी 25 हजार रुपये दर देऊन विकत घेतल्या.

बाबू अवसरे यांच्या आंब्याच्या पेटीला विक्रमी किंमत मिळाली

100 वर्षातील ऐतिहासिक दर..

शेतकऱ्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढवणारी 'मायको' ब्रँडची पहिली पेटी उद्योजक आणि सेंट अग्नेलो व्हीएनसीटी व्हेंचरच्या राजेश अथायडे यांनी 1 लाख 8 हजार रुपये अशी विक्रमी किंमत देऊन घेतली. जवळपास मागील 100 वर्षांमध्ये हापूस आंब्याच्या पेटीला इतकी मिळाली नव्हती. हा आजवरचा सर्वात मोठा विक्रम आहे. त्यामुळे आता येत्या काळात आंब्याच्या दरांकडे विक्रेते आणि खरेदीदारांचे बारीक लक्ष असणार आहे हे नक्की.

मॅरिएट येथे आंब्याचा लिलाव करण्यात आला
मॅरिएट येथे आंब्याचा लिलाव करण्यात आला

पहिले फळ बाजारात येण्यापासून ते अगदी या फळाची विक्री, दरांमध्ये होणारे चढउतार या साऱ्यावरच अनेकजण लक्ष ठेवून असतात. कारण, हा फळांचा राजा आपल्या घरी कधी येतो, याचीच उत्सुकताही सर्वांना लागलेली असते. याच साऱ्या उत्सुकतेच्या वातावरणात बाबू अवसरे यांच्या हापूस आंब्याने दरांचा एक वेगळाच विक्रम रचला आहे.

10 शेतकऱ्यांनी घेतला सहभाग..

या कार्यक्रमात देवगड सौंदळ मधील नाना गोखले, राजापूर पडवे येथील बाबू अवसरे, कुंभवडेमधील पंढरीनाथ आंबेरकर, शिरसे येथील संजय शिर्सेकर, वाडा तिवरे मधील जयवंत वेल्ये आणि रत्नागिरीचे गौरव सुर्वे उमंग साळवी, दीपक चव्हाण, तुषार साप्ते, शेखर दळवी असे एकूण दहा शेतकरी सहभागी झाले होते. हापुस आंबा या विषयात गेली वीस वर्षे सातत्यपूर्ण अनेक उपक्रम राबवणारे 'ग्लोबल कोकण'चे संस्थापक संजय यादवराव यांनी ही अभिनव संकल्पना मांडली आणि प्रत्यक्षात आणली.

हापूस आंब्याची पेटी फोडताना
हापूस आंब्याची पेटी फोडताना

यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, चिपळूण मधील आमदार व सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शेखर निकम, 'ग्लोबल कोकण'चे संचालक आणि हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया, माजी नगरसेवक आणि मुंबईतील हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, हापूस आंब्याचे एक्सपोर्टर दीपक परब, आणि इतर मान्यवर सहभागी झाले होते.

हेही वाचा : महिला दिन विशेष : कोल्हापुरातल्या एकाच कुटुंबातील सहा मुली झाल्या पोलीस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.