ETV Bharat / state

रत्नागिरीत रेकॉर्डब्रेक पाऊस! मोडला २०११ चा विक्रम

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. या दोन महिन्यांत पडलेल्या पावसाने अनुशेष भरून काढला आहे. ऐन गणेशोत्सवातही पावसाने धुमाकूळ घातला होता.

रत्नागिरी : पावसाने मोडला २०११ चा विक्रम; यावर्षी सर्वाधिक सरासरी ४७८३ मिमी पावसाची नोंद
author img

By

Published : Sep 28, 2019, 5:31 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यात यावर्षी विक्रमी पाऊस पडला आहे. मागील २९ वर्षांच्या तुलनेत यावर्षी झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे. या वर्षीच्या पावसाने २०११ चाही विक्रम मोडला आहे. २०११ मध्ये जिल्ह्यात सरासरी ४६८० मिमी इतका पाऊस पडला होता. मात्र, यावर्षी सरासरी ४७८३ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सध्याची पावसाची स्थिती पाहता यावर्षी पाऊस सरासरी ५ हजार मिमीचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा - लातुरात परतीच्या पावसाची दमदार हजेरी; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत

यावर्षी पाऊस काहीसा उशिरा सुरू झाल्याने शेतकरी वर्गासह सर्वच घटकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. पण सुरुवातीला कमी पाऊस पडला होता. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. या दोन महिन्यांत पडलेल्या पावसाने अनुशेष भरून काढला आहे. ऐन गणेशोत्सवातही पावसाने धुमाकूळ घातला होता. सप्टेंबर महिन्यात सुरुवातीचे ८ ते १० दिवस मुसळधार पावसामुळे नागरिकांना घराबाहेर पडता आले नाही. पण या मुसळधार पावसाने यावर्षी १० सप्टेंबरपर्यंत ४४०० ची सरासरी ओलांडली होती. त्यामुळे पाऊस २०११ चा विक्रम यावर्षी मोडणार हे निश्चित होते. पावसाने अखेर सरासरी ४७०० टप्पा ओलांडत गेल्या २९ वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद केली. पाऊस अजूनही चांगलाच बरसत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पाऊस सरासरी ५ हजार मिमीचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी : पावसाने मोडला २०११ चा विक्रम; यावर्षी सर्वाधिक सरासरी ४७८३ मिमी पावसाची नोंद

हे हाी वाचा - नाशिक जिल्ह्यातील धरणातून विसर्ग वाढला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

दरम्यान, 1991 पासून यावर्षीपर्यंत पावसाने 7 वेळा सरासरी 4 हजार मिमीचा टप्पा ओलांडला आहे.

गेल्या काही वर्षातील पावसाची आकडेवारी :-

१९९३- ४४०५ मिमी
२००१ - ४१७६ मिमी
२०१०- ४१३० मिमी
२०११ - ४६८० मिमी
२०१३ - ४११६ मिमी
२०१६- ४०८३ मिमी
२०१९ - ४७८३ मिमी ( २८ सप्टेंबरपर्यंत)

Intro:पावसाने मोडला 2011 चा विक्रम

यावर्षी सर्वाधिक सरासरी 4783 मिमी पावसाची नोंद

29 वर्षांतील सर्वाधीक पाऊस यावर्षी

रत्नागिरी, प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी विक्रमी पाऊस पडला असून, 1991 पासून 2019 पर्यंत म्हणजेच 29 वर्षांत सर्वाधिक पाऊस यावर्षी पडला आहे. यावर्षीच्या पावसाने 2011 चाही विक्रम मोडला आहे. 2011 मध्ये जिल्ह्यात सरासरी 4680 मिलिमीटर पाऊस पडला होता, यावर्षी मात्र पावसाने आतापर्यंत सरासरी 4783 चा टप्पा गाठला आहे.. सध्याची पावसाची स्थिती पाहता यावर्षी पाऊस सरासरी 5 हजार मिमीचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.
यावर्षी पाऊस काहीसा उशिरा सुरू झाला. त्यामुळे शेतकरी वर्गासह सर्वच घटकांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. पण सुरुवातीच्या लपंडानंतर मात्र पावसाने आपले रंग दाखविण्यास सुरुवात केली. आणि जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढलं. या दोन महिन्यांत पावसाने बॅकलॉग भरून काढला. त्यानंतर ऐन गणेशोत्सवातही पावसाने धुमाकूळ घातला. सप्टेंबर महिन्यात सुरुवातीचे 8 ते 10 दिवस पावसाने अशीकाही धुवांधार बरसात केली, की लोकं घराबाहेर पडायलाही धजावत नव्हते. त्यामुळे ऐन गणेशोत्सवातील या पावसामुळे चाकरमन्यांसह सर्वांचाच हिरमोड झाला. पण या मुसळधार पावसाने यावर्षी 10 सप्टेंबरपर्यंत 4400 ची सरासरी ओलांडली होती. त्यामुळे पाऊस 2011 चा विक्रम यावर्षी मोडणार हे निश्चित होतं.. आणि पावसाने अखेर सरासरी 4700 टप्पा ओलांडत गेल्या 28 वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद केली.. पाऊस सध्या अजूनही चांगलाच बरसत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पाऊस सरासरी 5 हजारचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.
दरम्यान 1991 पासून यावर्षीपर्यंत पावसाने 7 वेळा सरासरी 4 हजार मिलिमीटरचा टप्पा जिल्ह्यात ओलांडला आहे.
1993 - 4405
2001 - 4176
2010 - 4130
2011 - 4680
2013 - 4116
2016 - 4083
2019 - 4783 ( 28 सप्टेंबरपर्यंत) Body:पावसाने मोडला 2011 चा विक्रम

यावर्षी सर्वाधिक सरासरी 4783 मिमी पावसाची नोंद

29 वर्षांतील सर्वाधीक पाऊस यावर्षीConclusion:पावसाने मोडला 2011 चा विक्रम

यावर्षी सर्वाधिक सरासरी 4783 मिमी पावसाची नोंद

29 वर्षांतील सर्वाधीक पाऊस यावर्षी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.