ETV Bharat / state

'रिफायनरी'च्या समर्थनार्थ 'शक्तिप्रदर्शन'.. 8 हजार एकर जमीन देण्याचे संमतीपत्र - रिफायनरी प्रकल्प

रिफायनरी प्रकल्पाला एकीकडे विरोध होत असताना आज या प्रकल्पाच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले आहेत. 'झालाच पाहिजे, झालाच पाहिजे रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे', अशा घोषणा देत कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

protest-to-support-refinery-project-in-ratnagiri
8 हजार एकरचे संमतीपत्र घेऊन 'शक्तिप्रदर्शन'
author img

By

Published : Feb 22, 2020, 9:00 PM IST

रत्नागिरी- रिफायनरी प्रकल्पाला एकीकडे विरोध होत असताना आज या प्रकल्पाच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले आहेत. 'आम्हाला ग्रीन रिफायनरी प्रकल्प हवा आहे. तो आम्हाला मुख्यमंत्र्यांनी द्यावा', अशी मागणी करत डोंगर तिठा येथे आज नागरिकांनी शक्तीप्रदर्शन केले. नागरिक जमिनेचे संमतीपत्र घेऊन शक्तिप्रदर्शनात सहभागी झाले होते. प्रकल्पाच्या समर्थनार्थ कारवाई झालेले शिवसैनिकही यात सहभागी झाले होते.

8 हजार एकरचे संमतीपत्र घेऊन 'शक्तिप्रदर्शन'....

हेही वाचा- आमचं चुकलचं.. सदाभाऊ खोतांवर काय म्हणालेत राजू शेट्टी

'झालाच पाहिजे, झालाच पाहिजे रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे', अशा घोषणा यावेळी प्रकल्प समर्थकांनी दिल्या. कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे प्रदर्शन करण्यात आले. या प्रकल्पासाठी आज पर्यंत कोकण विकास प्रतिष्ठानकडे सुमारे 1 हजार 500 कुटुंबाचे सुमारे 2 हजार 500 सातबारे म्हणजेच ८ हजार एकरचे संमतीपत्र जमा झाले आहेत, असा दावा कोकण विकास प्रतिष्ठानने केला आहे. ती संमतीपत्र यावेळी सादर करण्यात आली.

दरम्यान, 'आम्ही गेले अनेक महिने याबाबत आमचे मत मांडण्यासाठी खासदार विनायक राऊत यांना विनंती केली होती. मात्र, त्यांनी आमचा आवाज दाबण्याचाच प्रयत्न केला. त्यामुळेच आम्ही आज शक्तिप्रदर्शन केले. रिफायनरी प्रकल्पास असणारा विरोध मावळला आहे. त्यामुळे कोकणच्या विकासासाठी या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाची गरज असून शासनाने हा प्रकल्प घोषित करावा', अशी मागणी यावेळी समर्थकांनी केली. दरम्यान नाणार समर्थक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील भेट मागितली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.