ETV Bharat / state

मान्सूनपूर्व पावसामुळे शेतीच्या कामांना वेग; पेरणीसाठी बळीराजाची लगबग सुरू

दरवर्षी पेक्षा आठवडाभर उशीरा पडलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्ह्यातील बळीराजाला दिलासा मिळाला आहे. दमदार पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराजाने पावसानंतर आता शेतीच्या कामांना गती दिली आहे. पेरणीची जवळपास80 टक्के कामं पूर्ण झाली असून शेतीच्या उकळीच्या कामांनाही वेग आला आहे.

author img

By

Published : Jun 15, 2019, 7:53 PM IST

मान्सूनपूर्व पावसामुळे शेतीच्या कामांना वेग; पेरणीसाठी बळीराजाची लगबग सुरू

रत्नागिरी - जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. दरवर्षी पेक्षा आठवडाभर उशीरा पडलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्ह्यातील बळीराजाला दिलासा मिळाला आहे. दमदार पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराजाने पावसानंतर आता शेतीच्या कामांना गती दिली आहे. पेरणीची जवळपास80 टक्के कामं पूर्ण झाली असून शेतीच्या उकळीच्या कामांनाही वेग आला आहे.

कोकणात भात हे मुख्य पीक घेतले जाते. कोकणातले अनेक शेतकरी मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणीला सुरवात करत असतात. तर काही शेतकरी दमदार पाऊस पडल्यानंतरच पेरणीला सुरवात करतात. त्यामुळे मान्सूनच्या दमदार आगमनाकडे बळीराजाचे लक्ष लागलेले आहे.

मान्सूनपूर्व पावसामुळे शेतीच्या कामांना वेग; पेरणीसाठी बळीराजाची लगबग सुरू

मान्सून उशिरा सुरू होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता. मात्र कोकणात गेल्या पाच ते सहा दिवसापासून मान्सूनपूर्व पाऊस नियमित हजेरी लावत आहे. दिवसभरात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरीवर्ग कमालीचा सुखावला आहे.

6-7 महिन्यांच्या विश्रांतीनंतर शेतीच्या मशागतीच्या कामांना नव्या जोमाने प्रारंभ झाला आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे जमिनीमध्ये पोषक असा ओलावा तयार झाला आहे. त्यामुळे भातबियाण्यांच्या पेरणीच्या कामांनाही सुरुमार्कस वात झाली आहे.

रोहिणी, मृग नक्षत्रांच्या मुहूर्तावर पेरणीची कामे करण्यावर शेतकरी भर देतात. या पेरण्या वेळेत झाल्या की पुढील शेतीची नांगरणी, लावणी या कामामध्ये खोळंबा निर्माण होत नाही. मान्सूनपुर्व पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला असून बळीराजाची लगबग वाढली असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. यापुढे पावसाने वाट पहायला न लावता अशीच साथ द्यावी, अशी अपेक्षा बळीराजा व्यक्त करत आहे.

Intro:मान्सूनपूर्व दमदार पावसामुळे बळीराजाची लगबग

मान्सूनपूर्व पावसामुळे शेतीच्या कामांना वेग

रत्नागिरी : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या वेशीवर आलेला मान्सून वायू वादळामुळे जरी पुढे गेला असला, तरी रत्नागिरी जिल्ह्यात मात्र गेले पाच ते सहा दिवस मान्सूनपूर्व पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. दरवर्षी पेक्षा आठवडाभर उशीरा कोसळलेल्या या मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्ह्यातील बळीराजाला दिलासा दिला आहे, या पावसावर भरोसा ठेवत बळीराजाने शेतीच्या कामांना गती दिली आहे. पेरणीची कामं जवळपास 80 टक्के कामं पूर्ण झाली आहेत. तर शेतीच्या उकळीच्या कामांनाही वेग आला आहे.

कोकणात भात हे मुख्य पीक. कोकणातले अनेक शेतकरी मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणीला सुरवात करतात. तर काहीं शेतकरी दमदार पाऊस पडेल तेव्हाच पेरणीला सुरवात करतात. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाकडे बळीराजाचे नेहमीच लक्ष लागलेले असते. जूनच्या प्रारंभाला पावसाचे आगमन झाल्यास शेतीच्या कामांनाही वेळेत प्रारंभ होत असतो. मात्र यावर्षी पावसाने ओढ दिली. मृग नक्षत्र आलं तरी मान्सूनचा पत्ता नाही. मान्सून उशिरा सुरू होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता. मात्र ऐनवेळी आलेल्या वायू वादळामुळे मान्सून आणखी काही दिवस लांबणीवर पडला आहे. पण कोकणात मात्र गेल्या पाच ते सहा दिवसांत मान्सूनपूर्व पावसाने नियमित हजेरी लावलेली आहे. दिवसभरात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असतात. या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरीवर्ग कमालीचा सुखावला आहे. पावसाला प्रारंभ होताच शेतीच्या कामांनाही वेग येतो. 6-7 महिन्यांच्या विश्रांतीनंतर शेतीच्या मशागतीच्या कामांनाही आता नव्या जोमाने प्रारंभ झालेला आहे. दमदार पावसामुळे जमिनीला पोषक ओलावा तयार झालेला आहे. त्यामुळे भातबियाण्यांच्या पेरणीच्या कामांनाही सुरूवात झाली आहे. या पेरण्या वेळेत झाल्या की पुढील शेतीची नांगरणी, लावणी या कामांनाही खोळंबा न होता वेळेत आटोपण्याकडे कल राहतो. त्यासाठी रोहिणी, मृग नक्षत्रांच्या मुहूर्तावर पेरण्यांची कामे करण्यावर भर दिला जातो. आता या कामांना वेग आला असून बळीराजाची लगबगही वाढली असल्याचे सर्वत्र चित्र दिसून येत आहे. यापुढे पावसाने वाट पहायला न लावता अशीच साथ द्यावी अशी अपेक्षा बळीराजा व्यक्त करत आहे.. याचाच आढावा घेत बळीराजाशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..Body:मान्सूनपूर्व दमदार पावसामुळे बळीराजाची लगबग

मान्सूनपूर्व पावसामुळे शेतीच्या कामांना वेगConclusion:मान्सूनपूर्व दमदार पावसामुळे बळीराजाची लगबग

मान्सूनपूर्व पावसामुळे शेतीच्या कामांना वेग
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.