ETV Bharat / state

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : शुभम लोणकर विरोधात लूक आऊट नोटीस, हत्येसाठी ऑस्ट्रेलियातून पिस्तूल मागवल्याचा संशय - BABA SIDDIQUE MURDER CASE

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर हत्या केली. या प्रकरणी शुभम लोणकरनं ऑस्ट्रेलिया आणि टर्कीतून पिस्तूल मागवल्याचा पोलिसांना संशय आहे.

Baba Siddique Murder Case
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 17, 2024, 10:04 AM IST

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची मागील शनिवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या हत्येतील चार आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलं असताना, यातील चौथा आरोपी प्रवीण लोणकरला मुंबई पोलिसांनी पुण्यातून अटक केली. यानंतर शुभम लोणकरच्या विरोधात पोलिसांनी लूक आउट नोटीस जारी केले आहे.

शुभम लोणकर विरोधात लूक आउट नोटीस : बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील प्रवीण लोणकरसह चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर या हत्याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून प्रवीण लोणकरला पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर शुभम लोणकरच्या विरोधात मुंबई पोलीस गुन्हे शाखेनं लूक आउट सर्क्युलर (एलओसी) नोटीस जारी केली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा कट रचण्यात शुभम लोणकरनं मदत केली, असा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी आरोपींना आर्थिक मदत केली आणि हत्येसाठी लागणाऱ्या शस्त्रांची व्यवस्था देखील शुभम लोणकरनं केली असा संशय पोलिसांना आहे.

शुभम पोबारा करण्याच्या तयारीत : दुसरीकडं बाबा सिद्दिकी यांची शनिवारी हत्या झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. या हत्येनंतर पोलिसांनी सर्वत्र मोठ्या प्रमाणात तपासाची सूत्रं हलवली. या तपासात दुसऱ्या दिवशी तीन आरोपींना अटक करण्यात आली. तर लगेचच संशयित आरोपी म्हणून प्रविण लोणकर याला पोलिसांनी पुण्यातून अटक केली. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर प्रविण लोणकर हा परदेशात पोबारा ठोकण्याच्या तयारीत होता. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येसाठी तुर्की आणि ऑस्ट्रेलियामधून पिस्तूल मागवण्यात आली होती. या पिस्तूलनंच बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली. तसेच ही पिस्तूल परदेशातून आणण्यास शुभमनं मदत केली, असं पोलिसांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडं बाबा सिद्दीकी यांच्या हत्यानंतर शुभम लोणकर हा नेपाळ, ऑस्ट्रेलिया किंवा तुर्कीमध्ये धूम ठोकण्याच्या तयारीत आहे. तशी शक्यता आहे, असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :

  1. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण ; मारेकऱ्यांनी अत्याधुनिक ऑस्ट्रेलियन ग्लॉक, टर्कीच्या जिगाना पिस्तूलचा केला वापर
  2. पुण्यात रचला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट; तीन महिन्यांपासून सुरू होतं प्लॅनिंग
  3. बाबा सिद्दीकींची हत्या करणारे आरोपी पुण्यात गोळा करायचे भंगार; आणखी एकाला अटक, पंजाब कनेक्शनही उघड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.