ETV Bharat / state

Shimgotsav : रत्नागिरीतल्या भैरी देवाच्या पालखीला पोलिस देतात मानवंदना

author img

By

Published : Mar 22, 2022, 4:37 PM IST

Updated : Mar 22, 2022, 8:07 PM IST

पालखीला मानवंदना देण्याची परंपरा आजही रत्नागिरीत कायम आहे. रत्नागिरीतला बारा वाड्यांचा मानकरी श्रीदेव भैरी. कोकणात होळी उत्सवात विविध परंपरा पहायला मिळतात. तशीच पण जरा हटके परंपरा रंगपंचमीच्या दिवशी दुपारी रत्नागिरीत पहायला मिळते.

Shimgotsav
Shimgotsav

रत्नागिरी - कोकणातल्या शिमगोत्सवातला रंगपंचमी हा महत्वाचा दिवस. रंगपंचमीच्या दिवशी रत्नागिरीच्या बारा वाड्यांचं ग्रामदैवत असलेल्या भैरी देवाच्या पालखीला चक्क पोलिस मानवंदना देतात. बंदूकधारी पोलिस एसएलआर बंदुकीच्या सहाय्याने पालखीला मानवंदना देतात. मग पालखी शहर दर्शनाला निघते. दरवर्षी मोठा माहोल असतो, रंगपंचमी खेळत पालखी निघते, त्यावेळी सारे रत्नागिरीकर या मिरवणूक सोहळ्यात दंग होऊन जातात. ब्रिटिश काळापासून चालत आलेली ही परंपरा रंगपंचमीला रत्नागिरीत अनुभवायला मिळते.

व्हीडीयो

पालखीला मानवंदना देण्याची परंपरा आजही रत्नागिरीत कायम आहे. रत्नागिरीतला बारा वाड्यांचा मानकरी श्रीदेव भैरी. कोकणात होळी उत्सवात विविध परंपरा पहायला मिळतात. तशीच पण जरा हटके परंपरा रंगपंचमीच्या दिवशी दुपारी रत्नागिरीत पहायला मिळते. ही परंपरा आगळी वेगळीच म्हणावी लागेल. रंगपंचमी खेळायला भैैरीची पालखी गावात निघते. त्यावेळी निघणाऱ्या भैरी देवाच्या पालखीला सहाणेवरच पोलिस मानवंदना देतात. बंदूकधारी पोलिस मानवंदना देण्य़ाची ही परंपरा ब्रिटिश काळापासून सुरु आहे. आजही ही प्रथा शिमगोत्सवात तेवढ्याच भक्ती भावाने जपली जात आहे. अंगावर वर्दी घातलेले हे पोलिस पालखीला मानवंदना देतात. एसएलआर बंदुकीच्या माध्यमातून ही मानवंदना दिली जाते. ही मानवंदना देताना पोलिसांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक वेगळा भक्तिभाव असतो. यावर्षी देखील मोठ्या उत्साहात हा मानवंदनेचा कार्यक्रम दुपारी पार पडला.

हेही वाचा - MLA Bhaskar Jadhav : आमदार भास्कर जाधवांनी देहभान विसरून नाचवली ग्रामदेवतेची पालखी..

Last Updated : Mar 22, 2022, 8:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.