ETV Bharat / state

'स्पेशल ट्रेनचं नियोजन आधी झालं असतं, तर फार चांगलं झालं असतं' - ganpati special trains news

ट्रेन लवकर सुरू होतील अशी आशा चाकरमान्यांना होती, मात्र 2 दिवसांपूर्वी गणपती स्पेशल ट्रेनची घोषणा झाली, सुरुवातीला मध्य रेल्वेकडून 182 आणि त्यानंतर पश्चिम रेल्वे कडून 20 फेऱ्यांची घोषणा झाली. याच ट्रेन काही दिवस अगोदर सुरू झाल्या असत्या तर मात्र परिस्थिती वेगळी दिसली असती, अशा प्रतिक्रिया चाकरमानी व्यक्त करत आहेत.

स्पेशल ट्रेनचं नियोजन आधी झालं असतं, तर फार चांगलं झालं असतं - चाकरमानी

author img

By

Published : Aug 16, 2020, 11:23 AM IST

Updated : Aug 16, 2020, 11:43 AM IST

रत्नागिरी - 'गणपती स्पेशल ट्रेनचं नियोजन आधी झालं असतं, तर फार चांगलं झालं असतं,' अशा प्रतिक्रिया गणपती स्पेशल ट्रेनने आलेल्या चाकरमान्यांच्या तोंडून ऐकायला मिळत आहेत. तसे पाहिले तर, कोणत्याही कालावधीत रेल्वेच्या प्रवासाला अनेकांची पहिली पसंती असते. मात्र, कोरोनाच्या काळात नियमावलीच्या अंतर्गत गाड्या सोडण्यास उशीर झाल्यामुळे या विशेष गाड्यांना चाकरमान्यांचा प्रतिसाद अल्प असल्याचं पहायला मिळत आहे. रत्नागिरीत दाखल झालेल्या पहिल्या गणपती स्पेशल ट्रेनने अवघे 11 प्रवासी तर, दुसऱ्या ट्रेननेही अवघे 16 प्रवासी रत्नागिरी रेल्वे स्थानकात दाखल झाले.

स्पेशल ट्रेनचं नियोजन आधी झालं असतं, तर फार चांगलं झालं असतं - चाकरमानी
स्पेशल ट्रेनचं नियोजन आधी झालं असतं, तर फार चांगलं झालं असतं - चाकरमानी
स्पेशल ट्रेनचं नियोजन आधी झालं असतं, तर फार चांगलं झालं असतं - चाकरमानी

सध्या कोरोनाचं संकट आहे, त्यातच गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवासाठी चाकरमानी अगदी हमखास आपल्या कोकणातल्या गावी येतोच. दरवर्षी गणेशोत्सवाच्या आधी मुंबईहून कोकणात येणाऱ्या गाड्यांना प्रवाशांची अक्षरशः झुंबड उडालेली असते. पण यावर्षी कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे गणेशोत्सवाला येणाऱ्या चाकरमान्यांसाठी सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 12 ऑगस्टपर्यंत येणाऱ्यांना दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी बंधनकारक आहे. मात्र, त्यानंतर येणाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले होते. शिवाय, 12 ऑगस्टनंतर येणाऱ्या चाकरमान्यांना घरातच राहून हा उत्सव साजरा करणेही बंधनकारक आहे. त्यामुळे अनेक चाकरमान्यांनी एसटी किंवा मिळेल त्या खासगी वाहनाने 12 ऑगस्टपूर्वी येण्याचा प्रयत्न केला.

ट्रेन लवकर सुरू होतील अशी आशा चाकरमान्यांना होती, मात्र 2 दिवसांपूर्वी गणपती स्पेशल ट्रेनची घोषणा झाली, सुरुवातीला मध्य रेल्वेकडून 182 आणि त्यानंतर पश्चिम रेल्वे कडून 20 फेऱ्यांची घोषणा झाली. त्यानंतर 15 ऑगस्टच्या रात्रीपासून मुंबईतून गणपती स्पेशल ट्रेन कोकणाकडे निघाल्या, मात्र सध्या या ट्रेनना चाकरमान्यांचा प्रतिसाद अल्प असल्याचं पहायला मिळत आहे. कारण रत्नागिरीत दाखल झालेल्या पहिल्या गणपती स्पेशल ट्रेनने अवघे 11 प्रवासी दाखल झाले, तर दुसऱ्या ट्रेननेही अवघे 16 प्रवासी रत्नागिरी रेल्वे स्थानकात उतरले.

रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर आलेली दुसरी ट्रेन म्हणजेच सीएसएमटी-सावंतवाडी ही ट्रेन सावंतवाडीकडे रवाना झाली. मात्र सावंतवाडीकडे रवाना होताना सुद्दा रेल्वेचे अनेक डबे रिकामे पहायला मिळाले. 'पण याच ट्रेन काही दिवस अगोदर सुरू झाल्या असत्या तर मात्र परिस्थिती वेगळी दिसली असती. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी गणपती स्पेशल ट्रेनचं नियोजन अगोदर झालं असतं, तर फार चांगलं झालं असतं', अशा प्रतिक्रिया आलेले चाकरमानी व्यक्त करत आहेत.

दरम्यान, ट्रेनने आलेल्या चाकरमान्यांची रेल्वे स्थानकात आरोग्य तपासणीही केली जात असून येणाऱ्या प्रवाशाची पूर्ण माहिती आरोग्य यंत्रणेकडून घेतली जात आहे. तसेच, 55 वर्षांवरील प्रवाशांची अँटीजेन टेस्टही केली जात असल्याची आरोग्य कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

Last Updated : Aug 16, 2020, 11:43 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.