ETV Bharat / state

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हे देशाच्या सुरक्षेच्या विरोधात, रत्नागिरीत सरकारविरोधी निदर्शने - त्नागिरीत सरकारविरोधी निदर्शने

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामधून (सीएबी)  मुस्लीम समाजाला वगळण्यात आले आहे. त्यामुळे मुस्लीम समाजात प्रचंड आक्रोश असल्याचे पाहायला मिळत आहे. याच विधेयकाच्या विरोधात  जमीअत उलमा हिंद रत्नागिरीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

ratnagiri
रत्नागिरीत सरकारविरोधी निदर्शने
author img

By

Published : Dec 14, 2019, 8:20 AM IST

रत्नागिरी - नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामधून (सीएबी) मुस्लीम समाजाला वगळण्यात आले आहे. त्यामुळे मुस्लीम समाजात प्रचंड आक्रोश असल्याचे पाहायला मिळत आहे. याच विधेयकाच्या विरोधात जमीअत उलमा हिंद रत्नागिरीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

रत्नागिरीत सरकारविरोधी निदर्शने

भाजपने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभा व राज्यसभेतही मंजूर करुन घेतले. त्यामुळे मुस्लीम समाजामध्ये नाराजीची भावना आहे. बांग्लादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान या देशात झालेल्या त्रासामुळे ज्या हिंदू, बौध्द, जैन, शीख, फारशी व ख्रिश्‍चन लोकांनी भारतात आश्रय घेतला आहे. त्यांना देशाचे नागरिकत्व देण्याची तरतुद या सुधारणा विधेयकात आहे. मात्र, मुस्लीमांना यातून वगळण्यात आल्याचा आक्षेप घेतला जात आहे. त्याचप्रमाणे या विधेयकामुळे कलम 14 तसेच इतर कलमांचे उल्‍लंघन होत असल्याचे मत निदर्शनामध्ये सहभागी झालेल्या मुस्लीम बांधवांनी व्यक्‍त केले. हे विधेयक देशाच्या सुरक्षेच्या विरोधात असून यामुळे कोणीही देशात घुसू शकतो अशा भावना व्यक्‍त केल्या जात आहेत.

Intro:नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून रत्नागिरीत निदर्शने

रत्नागिरी, प्रतिनिधी

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (सीएबी) मधून मुस्लीम समाजाला वगळण्यात आले आहे या व अन्य तरतुदींच्या विरोधात शुक्रवारी जमीअत उलमा हिंद रत्नागिरीच्यावतीने जोरदार निषेध करण्यात आला. याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.
भाजप शासनाने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभा व राज्यसभेतही मंजूर करुन घेतले. त्यामुळे मुस्लीम समाजामध्ये नाराजीची भावना आहे. बांग्लादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान या देशात झालेल्या छळ व त्रासामुळे ज्या हिंदू, बौध्द, जैन, शीख, फारशी व ख्रिश्‍चन लोकांनी भारतात आश्रय घेतला आहे. त्यांना देशाचे नागरिकत्व देण्याची तरतुद या सुधारणा विधेयकात आहे. मात्र मुस्लीमांना यातून वगळण्यात आल्याचा आक्षेप घेतला जात आहे. त्याचप्रमाणे या विधेयकामुळे कलम 14 तसेच इतर कलमांचे उल्‍लंघन होत असल्याचेही मत निदर्शनामध्ये सहभागी झालेल्या मुस्लीम बांधवांनी व्यक्‍त केली. हे विधेयक देशाच्या सुरक्षेच्या विरोधात असून यामुळे कोणीही देशात घुसू शकतो अशा भावना व्यक्‍त केल्या.
मौलाना अब्दुल शुकूर, मुफ्ती तौफीक सारंग, तारीख मुस्तफा, हाफीज जुबेद नाकाडे, आसीफ अकबानी, रियाज मुन्शी, जावेद मस्तान यांच्यासह मुस्लीम समाजातील अनेक प्रमुख मंडळी यात सहभागी झाली होती. यावेळी हजारोच्या संख्येने मुस्लीम बांधव सत्ताधार्‍यांच्या विरोधातील बॅनर, फलक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय आवाराच्या बाहेर निषेध व्यक्‍त करीत होते.Body:नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून निदर्शने
Conclusion:नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून निदर्शने
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.