रत्नागिरी - जिल्ह्यातील काळबादेवी येथील पारकर बिर्जेवाडी गावातील समुद्रकिनारी एक दुर्मिळ खवल्या मांजर आढळून आले. त्या मांजराला जीवदान देण्यात स्थानिकांना यश आले.
काळबादेवी येथील द्वारका पारकर नेहमीप्रमाणे समुद्रकिनारी फेरफटका मारण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना पाण्यात खवल्या मांजर दिसले. त्यांनी याची माहिती अमृत मयेकर यांना दिली. मयेकर यांच्यासह राजू पारकर यांनी तातडीने समुद्रकिनारी धाव घेतली. तिघांनी मिळून खवल्या मांजराला सुरक्षितपणे किनारी आणले. त्यानंतर याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनाधिकाऱ्यांनी मांजराला ताब्यात घेऊन सुरक्षित अधिवासात सोडले.