रत्नागिरी - महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत परप्रांतीय मच्छिमारी नौका घुसखोरी करत आहेत. मोठ्या संख्येने या नौका येत असल्याने स्थानिक मच्छिमारांना त्याचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मच्छिमार आक्रमक झाले आहेत.
रत्नागिरीच्या किनारपट्टी भागात सध्या कर्नाटक मलपीच्या बोटी मासेमारी करण्यासाठी येत आहेत. या घुसखोरी केलेल्या काही नौका या किनाऱ्यालगत मासेमारी करत असल्याचे स्थानिक मच्छिमारांच्या निदर्शनास येत आहेत. रत्नागिरी, गुहागर, राजापूरमध्ये किनारी भागात मलपी बोटी 15 ते 20 वावापर्यंत अतिक्रमण करून मच्छिमारी करत आहेत.
स्थानिक मच्छिमारांची कारवाईची मागणी -
स्थानिक मच्छिमारांकडून घुसखोरी करण्यात आलेल्या मच्छिमारी बोटींचा व्हिडिओ देखील मोबाईल कॅमेऱ्यात बनवलेला आहे. शेकडो बोटी घुसखोरी करत असल्याने इथल्या स्थानिक मच्छिमारांवर त्याचा परिणाम होत आहेत. या घुसखोरी केलेल्या नौका मोठ्या प्रमाणात मासेमारी करत असल्याने स्थानिक मच्छिमार आक्रमक झाले आहेत. त्यामुळे या नौकांवर मत्स्यविभागाने कारवाई करावी, अशी मागणी मच्छिमारांमधून होत आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांवर राणेंनी केलेल्या टीकेला शिवसेनेचे सडेतोड प्रत्युत्तर
हेही वाचा - रत्नागिरीत फिनो पेमेंट्स बँकेच्या 4 शाखांचे उद्घाटन, ग्राहकांना जलद गतीने मिळणार बँकिंग सुविधा