ETV Bharat / state

दापोलीत खवले मांजर व कासवाची शिकार, वनविभागाच्या छाप्यात एकाला अटक - hunting of pangolins turtles in dapoli

वन विभागाने या प्रकरणी कल्पेश याला ताब्यात घेतले आहे. त्याच्या अन्य साथीदारांचा आणि शिकारीसाठी वापरलेल्या अन्य वस्तूंचा तपास सुरू आहे. वन विभागाने कासव आणि खवले यांचे डीएनएनएसाठी नमुने घेतले आहेत. तर, जंगली सशाला जंगलात सोडण्यासाठी न्यायालयाची परवानगी मागितली आहे.

वनविभागाच्या छाप्यात एकाला अटक
वनविभागाच्या छाप्यात एकाला अटक
author img

By

Published : May 9, 2020, 12:51 PM IST

Updated : May 13, 2020, 7:16 AM IST

रत्नागिरी - वन विभागाने तालुक्यातील करंजाळी बालगुडेवाडी येथे छापा टाकला. यात दापोलीत कासव व खवले मांजराची शिकार झाल्याचे उघड झाले आहे. तर, जिवंत जंगली ससा सापडला आहे. याप्रकरणी वन विभागाने एकाला अटक केली आहे. ही व्यक्ती दापोलीतल्या करंजाळी गावातल्या बालगुडेवाडी येथील असून कल्पेश तुकाराम बालगुडे (वय 35) असे त्याचे नाव आहे.

दापोलीत खवले मांजर व कासवाची शिकार, वनविभागाच्या छाप्यात एकाला अटक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन सुरू आहे. ग्रामीण भागातही मोलमजुरीसाठी जाणारे घरीच आहेत. मात्र, या परिस्थितीतही काही लोक नियम तोडून काही उपद्व्याप करत आहेत. वन विभागाच्या छाप्यात असाच एक प्रकार दापोलीत घडल्याचे उघड झाले आहे.

शिकारीची माहिती मिळाल्यावरून दापोली वनविभागाने तालुक्यातील करंजाळी बालगुडेवाडी येथे छापा टाकला. यात कल्पेश याच्या घरामध्ये कासवाचे कवच, खवले मांजराचे एक पिशवी भरून ठेवलेले अडीच किलो खवले आणि जिवंत जंगली ससा सापडला. वन विभागाने या प्रकरणी कल्पेश याला ताब्यात घेतले आहे. त्याच्या अन्य साथीदारांचा आणि शिकारीसाठी वापरलेल्या अन्य वस्तूंचा तपास सुरू आहे. वन विभागाने कासव आणि खवले यांचे डीएनएनएसाठी नमुने घेतले आहेत. तर, जंगली सशाला जंगलात सोडण्यासाठी न्यायालयाची परवानगी मागितली आहे.

हा छापा चिपळूण येथील विभागीय वनाधिकारी रमाकांत भवर यांच्या मार्गदर्शनाखाली टाकला. दापोली वनाधिकारी वैभव बोराटे, वनपाल गणेश खेडकर, अनिल दळवी, गणपत जळणे, महादेव पाटील, सूरज जगताप, सुरेखा जगदाळे, आर. डी. पाटील, परमेश्वर डोईफोडे आदी वनरक्षकांनी छाप्यात भाग घेतला.

Last Updated : May 13, 2020, 7:16 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.