रत्नागिरी - जिल्ह्यात सध्या दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यात आज आणखी 11 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 476 वर पोहचली आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटी रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शून्यावर आली होती. मात्र 2 मे पासून रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे.
गेल्या महिनाभरात ही संख्या झपाट्याने वाढली. दररोज नवे रुग्ण आढळत आहे. दरम्यान शुक्रवारी रात्रीपासून आणखी 11 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये साडवली (संगमेश्वर) येथील 3, मूळचे उत्तरप्रदेशमधील असलेले 3, मूळचा कराड (विधानगर) येथील 1, तसेच खेड तालुक्यातील मधील एकाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 476 वर पोहचली आहे.
दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 343 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आजपर्यंत एकूण 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोना सक्रिय असणाऱ्या रुग्णांची संख्या 116 एवढी आहे.