रत्नागिरी - जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सोमवारी रात्री जिल्हा रुग्णालयाला प्राप्त अहवालात 35 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. यामुळे, जिल्ह्यातील बाधित रुग्णांचा आकडा 912 वर पोहोचला आहे तर, एका 70 वर्षीय महिला रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 900 च्या पुढे गेली आहे. सोमवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालांमध्ये जिल्ह्यात एकूण 35 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 912 इतकी झाली आहे. यात एका 70 वर्षीय महिला रुग्णाच्या मृत्यूनंतर आलेल्या अहवालाचा समावेशही आहे. यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 32 झाली आहे. या महिलेस रजिवडा येथून रविवारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेचा सोमवारी मृत्यू झाला. या महिलेचा कोणताही प्रवासाचा इतिहास नसून स्थानिक संसर्ग देखील नसल्याची माहिती आहे. नव्याने सापडलेल्या 35 रुग्णांमध्ये रत्नागिरी 2, कामथे 14, कळंबणी 5, गुहागर 6, दापोली 7, तर रत्नागिरीतील एकाचा मृत्यू झालेला आहे.
जिल्ह्यातील सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्हची संख्या - 912
बरे झालेले - 627
मृत्यू - 32