रत्नागिरी - मुख्यमंत्र्यांचे फेसबुक लाईव्ह म्हणजे तोच तोच पणा आहे, कोरोना मुक्तीकडे जाण्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही. मुख्यमंत्र्यांना कितीही वेळा ऐका काहीही समजत नाही. मुख्यमंत्र्यांचे भाषण एकूण "थ्री इडियट्स" मधला एक डायलॉग आठवतो, तुम केहना क्या चाहते हो? हा तो डायलॉग आहे. अशा शब्दात भाजपा नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
आरोग्य सुविधांवर लक्ष देण्याची गरज
मंगळवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यावरून भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री मीडिया समोर येऊन त्याच - त्याच विषयावर भाष्य करत असतात. राज्याच्या हितासाठी कोणत्या उपाययोजना करायला पाहिजे? काय बोलावं? कस बोलावं? हे त्यांनाच कळत नाही. ठाकरे सरकारचं आरोग्य सुविधांवर दुर्लक्ष झाले आहे. नियोजन शुन्य कारभारामुळे राज्याचा श्वास गुदमरतोय आहे. राज्यात लॉकडाऊन करण्यापेक्षा राज्य सरकारने आरोग्य सुविधांवर लक्ष द्यायला पाहिजे अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.
हेही वाचा - 'ब्रेक दि चेन'ची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, मुख्यमंत्र्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना