ETV Bharat / state

'शिवसेना-राष्ट्रवादी सारख्या विरोधकांना "हा" विषय चिघळवायचा आहे'

author img

By

Published : Dec 8, 2020, 3:18 PM IST

Updated : Dec 8, 2020, 5:06 PM IST

ज्या कायद्याचा विरोध आज राष्ट्रवादी आणि संपूर्ण महाविकास आघाडी करत आहे. त्याच कायद्याची मागणी शरद पवारांनी 2010 मध्ये पत्राद्वारे केली होती. शरद पवारांनी स्वतःच्याच पत्राची भूमिका बदलण्यासाठी नेमके काय झाले, असा सवाल भाजप नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांनी उपस्थित केला.

निलेश राणे
निलेश राणे

रत्नागिरी - शिवसेना-राष्ट्रवादी सारखे जे विरोधक आहेत त्यांना हा विषय चिघळवायचा आहे. त्यांना कुठेतरी वाटतंय की मोदी सरकार संकटात येईल, अडचणीत येईल, त्यामुळे ते हा विषय त्यांच्या माध्यमातून पेटवायचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी महाविकास आघाडीवर केला आहे. ते रत्नागिरीत बोलत होते.

बोलताना निलेश राणे

शरद पवारांनी भूमिका का बदलली

यावेळी बोलताना निलेश राणे म्हणाले की, ज्या कायद्याचा विरोध आज राष्ट्रवादी आणि संपूर्ण महाविकास आघाडी करत आहे. त्याच कायद्याची मागणी शरद पवारांनी 2010 मध्ये पत्राद्वारे केली होती. आता नेमके काय झाले, शरद पवारांनी स्वतःच्याच पत्राची भूमिका का बदलली. 10 वर्षांपूर्वी एक भूमिका आणि 10 वर्षानंतर आता एक भूमीका घेत शरद पवार विरोध का करत आहेत, असे राणे म्हणाले.

शिवसेना कायदे कधी वाचत नाही

शिवसेनेबाबत बोलताना निलेश राणे म्हणाले की, शिवसेनेचे सोडून द्या, शिवसेनेला तेवढी अक्कल नाही त्यांनी ते कायदेही वाचले नसतील, शरद पवार विरोध करताहेत म्हणून शिवसेना विरोध करत आहे.

विरोधकच विस्कटलेले

पश्चिम बंगाल सारख्या राज्याच्या मुख्यमंत्री सुद्धा म्हणताहेत, आमचा भारत बंदला पाठींबा नाही, शेतकऱ्यांना पाठींबा आहे. विरोधकच विस्कटलेले आहेत. त्यांच्यातच एकी नाही. त्यांना विषयच कळलेले नाही. मोदी सरकारला अडचणीत कसे आणायचे त्यासाठी हा विरोध आहे.

शरद पवार म्हणतात माझ्या पत्राचा विपर्यास करण्यात येतोय

शरद पवारांनी लिहिलेल्या पत्राचा दाखला देत सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. याला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, मी लिहिलेल्या पत्राचा विपर्यास करण्यात येत आहे. ज्यांनी हे पत्र समोर आणले ते आणण्यापूर्वी त्यात मी काय म्हटले होते ते निट वाचले असते तर त्यांना नक्की समजले असते. केवळ विषय भरकटवण्यासाठी हे पत्र समोर आणले गेले असल्याचे शरद पवार यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

हेही वाचा - भारत बंद.. जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार ठप्प

Last Updated : Dec 8, 2020, 5:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.