ETV Bharat / state

'निसर्ग वादळानंतर आलेला निधी शिवसेनेचे कोतवाल आणि सरपंच वाटून खातायेत'

आत्मनिर्भर रॅलीवर टीका करणाऱ्या पालकमंत्री अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्ह्यासाठी काय योगदान दिले, हे जाहीर करावे. त्यानंतरच टीका करावी, अशा शब्दांत निलेश राणे यांनी मंत्री अनिल परब यांचा समाचार घेतला आहे.

nilesh rane on anil parab
'निसर्ग वादळानंतर आलेला निधी शिवसेनेचे कोतवाल आणि सरपंच वाटून खातायेत'
author img

By

Published : Jul 6, 2020, 6:22 PM IST

रत्नागिरी - आत्मनिर्भर रॅलीवर टीका करणाऱ्या पालकमंत्री अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्ह्यासाठी काय योगदान दिले, हे जाहीर करावे. त्यानंतरच टीका करावी, अशा शब्दांत निलेश राणे यांनी मंत्री अनिल परब यांचा समाचार घेतला आहे. निसर्ग वादळात जनतेला केलेली मदत शिवेनेचेच कोतवाल आणि सरपंच वाटून खात असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारला जाब विचारणे ही टीका कशी काय होऊ शकते, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. 'शिवसेनेचा 'ड्रामा' आता जनतेला पचणार नाही, लवकरच भ्रष्टाचार बाहेर काढणार', असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.

'निसर्ग वादळानंतर आलेला निधी शिवसेनेचे कोतवाल आणि सरपंच वाटून खातायेत'

पालकमंत्री जिल्ह्यात अडीच दिवस फिरकले

पालकमंत्री अनिल परब यांनी भारतीय जनता पक्षाच्याच्या आत्मनिर्भर रॅलीवर टीका केली होती. या टीकेचा खरपूस समाचार राणे यांनी घेतला. पालकमंत्री अनिल परब मागील तीन महिन्यांत जिल्ह्यात फक्त अडीच दिवसच येऊन गेले; बाकी त्यांचा पूर्णवेळ मातोश्रीवरच गेला, असा टोला त्यांनी लगावला. निसर्ग चक्रीवादळ महिना उलटून गेला असताना त्यांनी या भागातील परिस्थितीची एकदाही पाहणी करण्यासाठी वेळ मिळाला नाही. मुंबईत बसून व्हिडिओ टाकण्याचे आणि टीका करण्याचे काम ते करत आहेत. अशाप्रकारे चाललेल्या कारभाराबाबत, भ्रष्टाचाराबाबत, आम्ही विरोधक म्हणून जर सरकारला जाब विचारला, तर त्याची उत्तरं द्यायलाच हवीत. आमचे प्रश्न म्हणजे ह्यांना टीका वाटते, म्हणून आम्ही फक्त बघत बसायचे का? असा सवाल राणे यांनी केला.

शिवसेनेचा ड्रामा लोक खपवून घेणार नाही

पालकमंत्री म्हणून रत्नागिरी जिल्ह्यासाठी अनिल परब यांनी काय योगदान दिले ते आधी सांगावे. जिल्हा रुग्णालयात सुरू असलेली लॅब सतत बंद पडते. अपुरे कर्मचारी आहेत. अशा गोष्टींकडे त्यांचे लक्ष नाही. निसर्ग वादळानंतर आजही अनेक घरांमध्ये वीज पुरवठा पूर्ववत झालेला नाही. अनेकजण मदतीपासून उपेक्षित आहेत. त्यामुळे टीका करण्यापेक्षा जिथे मदत पोहोचली नाही, तिथे मदत पोहोचवण्यासाठी मंत्री साहेबांनी प्रयत्न करावेत, असा टोलाही निलेश राणे यांनी लगावला.

तिवरे धरणाबाबतही तीच परिस्थिती आहे. एक वर्ष उलटून गेल्यानंतरही तिथले लोक कंटेनरमध्ये राहत आहेत. आता ही वस्तुस्थिती लोकांसमोर येत आहे. त्यामुळेच शिवसेनेचा 'ड्रामा' आता चालणार नाही.

उदय सामंत गुन्हेगारांना वाचवण्याच्या प्रयत्नात

जिल्ह्याची प्रशासकीय सूत्र रत्नागिरीतून हलतात. अशावेळी कोरोनाच्या बाबतीत महत्वाचे निर्णय घेणे अपेक्षित होते. पण 200 रुग्णांचे सुद्धा क्वारंटाइन शिक्षण मंत्री उदय सामंत करू शकले नाहीत. त्यासाठी स्वतःचे योगदान देऊ शकले नाहीत. उलट अवैध दारू धंद्यावर पडलेल्या छाप्यातील माणसाला कसे वाचवायचे, याची काळजी उच्चतंत्र शिक्षण मंत्र्यांना लागल्याची टीका राणे यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.