ETV Bharat / state

रत्नागिरीत काल 508 जणांना कोरोना, 14 मृत्यू

रत्नागिरीत काल 508 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ratnagiri
ratnagiri
author img

By

Published : May 31, 2021, 4:11 AM IST

रत्नागिरी - जिल्ह्यात काल (30 मे) 508 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 36 हजार 044 झाली आहे. तर काल 14 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

508 नवे रुग्ण

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काल आलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यात 508 नवे रुग्ण सापडले आहेत. नव्याने सापडलेल्या 508 रुणांपैकी 296 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले आहेत. तर 212 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. जिल्ह्यात तब्बल 1966 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 17.67 टक्के झाला आहे.

14 मृत्यू

काल 14 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1217 जणांचा बळी गेला आहे. सध्या जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर 3.37 वर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

हेही वाचा - रायगड : पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत सर्वाधिक मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.