रत्नागिरी - जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. काल (29 मे) दिवसभरात ४९४ नवे रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या ११९० झाली आहे.
काल ४९४ पॉझिटिव्ह
काल २ हजार ४०५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ४९४ पॉझिटिव्ह, तर १९११ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत १ लाख ६५ हजार ७२० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर ३५ हजार ५३६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यातील ३० हजार ९०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या ३३४४ रुग्ण जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून उपचार घेत आहेत.
१६ जणांचा मृत्यू
काल दिवसभरात १६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक ३४७, तर खेड १२२, गुहागर ६६, दापोली १०५, चिपळूण २३८, संगमेश्वर १५१, लांजा ६५, राजापूर ८४ आणि मंडणगडमध्ये १२ मृत्यू झाले आहेत.
हेही वाचा - मध्य प्रदेश : अल्पवयीन मुलांसमोर गर्भवती महिलेवर बलात्कार