रत्नागिरी - जिल्ह्यात गेल्या काल (27 मे) 437 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढून 34 हजार 626 झाली आहे. तर काल 14 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
काल 486 जण कोरोनामुक्त
गुरुवारी (27 मे) आलेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात 437 नवे रुग्ण सापडले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 237 रुग्ण आरटीपीसीआर, तर 200 रुग्ण अँटीजेन चाचणीत बाधित सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 34 हजार 626 वर जाऊन पोहोचली आहे. जिल्ह्यात काल 486 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
14 जणांचा मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यात काल 14 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वाढते मृत्यू आणि वाढलेल्या रुग्णसंख्येने आरोग्य विभाग चिंतेत आहे. नव्याने झालेल्या 14 मृत्यू पैकी रत्नागिरी तालुक्यात 7 मृत्यू झाले आहेत. याशिवाय लांजा 1 , राजापूर 1, संगमेश्वर 1, दापोली 1, चिपळूण 2 आणि खेड तालुक्यात 1 मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 149 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
सर्वाधिक मृत्यू रत्नागिरी तालुक्यात
सर्वाधिक 334 मृत्यू रत्नागिरी तालुक्यात झाले आहेत. चिपळूण तालुक्यात 229, खेड 120, गुहागर 62, दापोली 101, संगमेश्वर 147, लांजा 63, राजापूर 81 आणि मंडणगड तालुक्यात 12 मृत्यू झाले आहेत.
हेही वाचा - दिलासादायक..! रुग्ण बरे होण्याचा दर 93 टक्क्यांवर, 21 हजार 273 नवे रुग्ण