ETV Bharat / state

रत्नागिरी जिल्ह्यात 89 नव्या कोरोना रुग्णांची वाढ, बाधितांची संख्या 1000 पार

author img

By

Published : Jul 15, 2020, 7:48 PM IST

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. आज एकाच दिवशी तब्बल 89 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकाच दिवशी जिल्ह्यात एवढे रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये रत्नागिरी - 13, कळबणी -17, घरडा (खेड) 20, संगमेश्वर - 3, कामथे -19, गुहागर - 10, दापोली - 7 जणांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 1000 पार

रत्नागिरी - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आज 1 हजारच्या पुढे गेली आहे. आज (बुधवार) सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालांमध्ये 89 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 49 झाली आहे. दरम्यान 21 रुग्णांना बरे झाल्यानंतर आज घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 655 झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये घरडा येथून 1, जिल्हा कोविड रुग्णालय येथून 4, कोविड केअर सेंटर, पेढांबे येथून 13 आणि 3 समाजकल्याण रत्नागिरीमधील आहेत.

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. आज एकाच दिवशी तब्बल 89 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकाच दिवशी जिल्ह्यात एवढे रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये रत्नागिरी - 13, कळबणी -17, घरडा (खेड) 20, संगमेश्वर - 3, कामथे -19, गुहागर - 10, दापोली - 7 जणांचा समावेश आहे. दरम्यान दापोली तालुक्यातील आडे येथील 62 वर्षीय महिला कोरोना रुग्णाचा आज उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबाधित मृत्यूंची संख्या आता 34 झाली आहे. सध्या एकूण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण 360 आहेत.

11 हजार पेक्षा जास्त निगेटिव्ह

जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 12 हजार 864 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 12 हजार 414 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 1049 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 11 हजार 442 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजून 350 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.