रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान बुधवारी (21एप्रिल) आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 477 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 477 पैकी 189 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले, तर 288 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 477 नवे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या 17 हजार पार झाली आहे. तर गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात तब्बल 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
एका दिवसात 477 नवे रुग्ण -
जिल्ह्यात गेल्या काही दिवसात सातत्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात सापडू लागले आहेत. दरम्यान गेल्या 24 तासात 477 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 17 हजार 051 वर जाऊन पोहचली आहे . बुधवारी आलेल्या अहवालात 189 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 288 रुग्ण अँटीजेन रॅपिड चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत.
477 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 75 , दापोली 9, खेड 39, गुहागर 95, चिपळूण 55, संगमेश्वर 107, मंडणगड 6, राजापूर 23 आणि लांजा तालुक्यातील 68 रुग्णांचा समावेश आहे. तर मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने तब्बल 13 रुग्णांचा बळी गेला असून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 488 इतकी आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 2.86 % आहे.