ETV Bharat / state

Uday Samant : राष्ट्रवादीच्या आमदाराने केले उदय सामंत यांचे कौतुक; चिपळूणमध्ये राजकीय नेत्यांची फटकेबाजी - NCP MLA Shekhar Nikam

चिपळूणमध्ये वाशिष्ठी मिल्क अ‍ॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्सच्या उद्घाटन सोहळ्यात राजकीय नेत्यांनी चांगलीच फटकेबाजी केली. उदय सामंत आणि मी आम्ही एकमेकांच्या विरोधात किती जरी बोललो, तरी रात्री जेवायला एकत्र असतो असे आमदार प्रसाद लाड यांनी बोलतांना सांगितले. तर उदय सामंत सगळ्यांना विश्वासात घेऊन चांगलं काम करत आहेत असे राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यावेळी म्हणाले.

NCP MLA praised Uday Uday Samant
राष्ट्रवादीच्या आमदारांने केले उदय उदय सामंत यांचे कौतुक
author img

By

Published : Feb 5, 2023, 10:50 PM IST

चिपळूणमध्ये राजकीय नेत्यांची फटकेबाजी

रत्नागिरी : काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि उद्योजक प्रशांत यादव व चिपळूण नागरी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना प्रशांत यादव या दाम्पत्याने कोकणातील शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसायाचा पर्याय उभा करून त्यांना समृद्ध करण्याचे स्वप्न उराशी बाळगून मे. वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्टस् प्रा. लि. या दुग्धप्रकल्पाची उभारणी केली आहे. या प्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज व्हीसी द्वारे पार पडलं. त्यानंतर प्रत्यक्ष उदघाटन सोहळा उद्योग मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते आणि अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी भाजप नेते, आमदार प्रसाद लाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

रात्री जेवायला एकत्र : यावेळी भाजपा आमदार प्रसाद लाड म्हणाले की, मंत्री उदय सामंत आणि मी आम्ही एकमेकांच्या विरोधात जरी बोललो, तरी रात्री जेवायला एकत्र असतो, एवढी आमची मैत्री आहे. आता तर प्रॉब्लेमच नाही आम्ही दोघंही एकदम घट्ट झालोय, गुवाहाटीपासून मुंबईपर्यंत असं लाड यांनी सांगताच एकच हशा पिकला.

उदय सामंत यांचं कौतुक : राष्ट्रवादी आमदार शेखर निकम म्हणाले की, मंत्री उदय सामंत सगळ्यांना विश्वासात घेऊन चांगलं काम करत आहेत. कोकणाचा प्रश्न असेल तर त्यावेळी कुठचंही राजकारण न करता ते काम करतात असं कौतुक राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी मंत्री उदय सामंत यांचं केलं.

मुख्यमंत्री चिपळूणला येतील : काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि वाशिष्ठी प्रकल्पाचे प्रमुख प्रशांत यादव यांच्याबाबत बोलताना मंत्री उदय सामंत यांनी अतिशय सूचक विधान करत प्रशांत यादव यांना ऑफरही देऊन टाकली. 'प्रशांतजी स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेच, भविष्यात शिंदे साहेबांचा आशीर्वाद लागणार असेल तर तोही आम्ही देण्याची हमी देऊ. म्हणजे प्रकल्प बघण्याचा नाहीतर शेखर सर याचा वेगळा अर्थ काढतील. पण सर तुम्ही वेगळा अर्थ काढू नका असं सामंत यांनी म्हणताच एकच हशा पिकला. दरम्यान, आज जरी मुख्यमंत्री तांत्रिक अडचणीमुळे मुख्यमंत्री येऊ शकले नसले तरी पुढच्या दौऱ्यामध्ये जेव्हा मुख्यमंत्री चिपळूणला येतील तेव्हा हा प्रकल्प पाहण्यासाठी ते इथे येतील. जेवणासाठी देखील तुमच्या घरी येतील, नंतर तुम्हाला काय निर्णय घ्यायचा असेल तो घ्या.

हेही वाचा - KCR Criticized PM Modi : खासगीकरणावरुन केसीआर यांचा मोदी सरकारवर घणाघात; म्हणाले, 2024 मध्ये आम्हीच सत्तेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.