ETV Bharat / state

राजापूर मतदारसंघातला 'विकास' आम्ही शोधतोय, अविनाश लाड यांचा राजन साळवींना टोला - avinash lad

लांजा शहरामध्ये आज काँग्रेसकडून प्रचारफेरी काढण्यात आली होती. यावेळी राजापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस -काँग्रेस आघाडीचे उमेदवार अविनाश लाड यांनी विद्यमान आमदार आणि शिवसेना उमेदवार राजन साळवी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस -काँग्रेस आघाडीचे उमेदवार अविनाश लाड
author img

By

Published : Oct 15, 2019, 7:40 PM IST

Updated : Oct 16, 2019, 3:04 AM IST

रत्नागिरी - राजापूर विधानसभा मतदारसंघात नेमका काय विकास झाला आहे, तो विकास आम्ही शोधत असल्याचा टोला लगावत राजापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस -काँग्रेस आघाडीचे उमेदवार अविनाश लाड यांनी विद्यमान आमदार आणि शिवसेना उमेदवार राजन साळवी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. लांजा शहरामध्ये आज काँग्रेसकडून प्रचारफेरी काढण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस -काँग्रेस आघाडीचे उमेदवार अविनाश लाड यांची प्रतिक्रिया

यावेळी बोलताना अविनाश लाड म्हणाले की, राजापूर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजलेले आहेत. पाण्याची बोंबाबोंब आहे. मात्र, आमदार राजन साळवी लोकांना फसवण्याचे, थापा मारण्याचे आणि खोटे बोलायचे एवढेच काम करत असल्याची टीका अविनाश लाड यांनी केली आहे. 400 कोटींची कामे केली म्हणतात ती आहेत कुठे? असा सवाल अविनाश लाड उपस्थित केला आहे. यांनी फक्त ठेकेदारांसाठी कामे केली, जनतेसाठी काहीही केले नाही, नुसती दिशाभूल केली. त्यामुळे जनतेचा उद्रेक आता झालेला असून या निष्क्रिय माणसाला घालवण्याची आता लोकांनीच तयारी केलेली आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचे लाड यावेळी म्हणाले.

हेही वाचा - नाशकात युतीत बिघाडी, 36 सेना नगरसेवकांचे राजीनामे

बेरोजगारांना रोजगार, जनतेला आरोग्य आणि पाण्याची सोई, कशा मिळतील यासाठी आपण प्रयत्न करू असे लाड यावेळी म्हणाले. दरम्यान, नाणार बाबत बोलताना लाड म्हणाले की आम्ही येथील जनतेबरोबरच आहोत, आम्हाला कारखानदारी हवी आहे. मात्र, असले प्रदूषणकारी प्रकल्प नकोत असंही, ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा -ईव्हीएममध्ये नव्हे तुझ्या बोटातच घोळ आहे - अजित पवार

Intro:राजापूर मतदारसंघातला 'विकास' आम्ही शोधतोय -- अविनाश लाड यांचा आ. राजन साळवींना टोला

रत्नागिरी, प्रतिनिधी

राजापूर विधानसभा मतदारसंघात नेमका काय विकास झाला आहे, तो विकास आम्ही शोधत असल्याचा टोला लगावत राजापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस -काँग्रेस आघाडीचे उमेदवार अविनाश लाड यांनी विद्यमान आमदार आणि शिवसेना उमेदवार राजन साळवी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. लांजा शहरामध्ये आज काँग्रेसकडून प्रचारफेरी काढण्यात आली.
यावेळी बोलताना अविनाश लाड म्हणाले की, राजापूर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे, आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजलेले आहेत. पाण्याची बोंबाबोंब आहे. मात्र आमदार राजन साळवी लोकांना फसवण्याचं, थापा मारण्याचं आणि खोटं बोलायचं एवढंच फक्त काम काम करत असल्याची टीका अविनाश लाड यांनी केली आहे. 400 कोटींची कामं केली म्हणतात ती आहेत कुठे असा सवाल अविनाश लाड उपस्थित केला आहे. यांनी फक्त ठेकेदारांसाठी कामं केली, जनतेसाठी काहीही केलं नाही, नुसती दिशाभूल केली. त्यामुळे जनतेचा उद्रेक आता झालेला असून या निष्क्रिय माणसाला घालवण्याची आता लोकांनीच तयारी केलेली आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचं लाड यावेळी म्हणाले.. बेरोजगारांना रोजगार, आरोग्य आणि पाणी या सोई जनतेला कशा चांगल्या मिळतील यासाठी आपण प्रयत्न करू असं लाड यावेळी म्हणाले. दरम्यान नाणार बाबत बोलताना लाड म्हणाले की आम्ही इथल्या जनतेबरोबरच आहोत, आम्हाला कारखानदारी हवीय मात्र असले प्रदूषणकारी प्रकल्प नकोत असंही ते यावेळी म्हणाले.

Byte - अविनाश लाड, काँग्रेस उमेदवार

Body:राजापूर मतदारसंघातला 'विकास' आम्ही शोधतोय -- अविनाश लाड यांचा आ. राजन साळवींना टोलाConclusion:राजापूर मतदारसंघातला 'विकास' आम्ही शोधतोय -- अविनाश लाड यांचा आ. राजन साळवींना टोला
Last Updated : Oct 16, 2019, 3:04 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.