ETV Bharat / state

जन आशीर्वाद यात्रेतून राणे कोकणात कोरोनाची तिसरी लाट आणत आहेत - विनायक राऊत - rane is bringing third wave of corona in kokan through his jan ashirwad yatra

नारायण राणे जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून कोकणात तिसरी लाट घेऊन येत आहेत आणि कोकण वासीयांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचं काम करत आहेत अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. कोकण वासीयांच्या जीवाशी खेळण्याचा हा कुटील डाव असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.

जन आशीर्वाद यात्रेतून राणे कोकणात कोरोनाची तिसरी लाट आणत आहेत - विनायक राऊत

author img

By

Published : Aug 22, 2021, 1:09 PM IST

Updated : Aug 22, 2021, 1:27 PM IST

रत्नागिरी : नारायण राणे जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून कोकणात तिसरी लाट घेऊन येत आहेत आणि कोकण वासीयांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचं काम करत आहेत अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. कोकण वासीयांच्या जीवाशी खेळण्याचा हा कुटील डाव असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.

कोकण वासीयांच्या जीवाशी खेळभाजपची जन आशीर्वाद यात्रा सध्या राज्यात सुरु आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या रत्नागिरीत उद्या जन आशीर्वाद यात्रा दाखल होत आहे. याबाबत बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, राणेंच्या शक्ती प्रदर्शनाला अर्थच नाही. केवळ स्वतःचे ढोल वाजवून मिरवणूका काढणे या पलीकडे या शक्ती प्रदर्शनाला काही अर्थ नाही. उलट नारायण राणे या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून कोकणात तिसरी लाट घेऊन येत आहेत. कोकण वासीयांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचं काम ते करत आहेत. कोकण वासीयांच्या जीवाशी खेळण्याचा हा कुटील डाव असल्याची टीका राऊत यांनी केली.कोकण आणि शिवसेना हे समीकरणकोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तो उद्याही राहील. त्यामुळे अशा प्रकारच्या जन आशीर्वाद यात्रा आल्या काय किंवा गेल्या काय, आम्हाला फिकीर करण्याची मुळीच गरज नाही. यापूर्वीही शिवसेनेच्या आमदारांचा पराभव करण्यासाठी जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती. पण त्यांनाही नाही जमलं. त्यामुळे कोकण आणि शिवसेना हे जे समीकरण आहे ते राणेंच्या पाठीमागून कधीही जाणार नाही. हे यापूर्वीही कोकणने दाखवून दिल्याचं राऊत म्हणाले.दानवेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावीकेंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधींविषयी केलेल्या विधानावर बोलताना भाजपच्या नेत्यांना सत्तेची मस्ती आल्याची टीका राऊत यांनी केली. यात भाजपच्या नेत्यांची विकृती दिसून येते. राजकीय नेत्याला सांड म्हणणं म्हणजेच दानवे गुरुजींची बुद्धी भ्रष्ट झाल्याचे राऊत म्हणाले. दानवे यांची बुद्धी नेहमीच भ्रष्ट झालेली असते, त्यांची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घ्यावी. त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणीही राऊत यांनी केली.

हेही वाचा - एकनाथ शिंदे मंत्री असले तरी ते सही पुरतेच, नारायण राणेंची टीका

Last Updated : Aug 22, 2021, 1:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.