रत्नागिरी - मी पुन्हा येईल, असे न बोलताही आपण मुख्यमंत्री झालो. तसेच कोणत्याही सभागृहाचा सभासद नसतानाही पदावर आरूढ झालो. हे सर्व महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वादाने झाल्याचे, उद्धव ठाकरे स्वतः सांगतात. त्यांच्या या मोठेपणाचे विरोधकांनी कौतुक केले पाहिजे, असे शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... प्रत्येक पक्षात नाराजी तशीच भाजपमध्येही.. बैठकीतील चर्चेवर बोलण्यास विखेंचा नकार
सत्ता येणार नाही म्हणून काहीजण सांगत होते, तरीही उद्धव ठाकरे मु्ख्यमंत्री झाले. मंत्रीमंडळ स्थापन होणार नाही म्हणताना सहा मंत्री झाले. आता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही, असे बोलतात. पण येत्या 30 डिसेंबरला ३६ मंत्री शपथ घेत आहेत. त्यामुळे ज्या लोकांकडे भरपूर वेळ आहे, ते बोलतच राहतात त्यांना बोलु द्या. आम्ही आमचे काम करतो आहे, अशी खोचक टीका शिवसेना आमदार आणि म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी नारायण राणे यांच्यावर केली आहे.
हेही वाचा... सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? फडणवीसांचा सेनेवर हल्लाबोल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याबद्दल अनेकदा आदर व्यक्त केला. कारण आमचे मुख्यमंत्री मोठ्या मनाने सांगतात की, मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो, त्यामुळे पवारांचा सल्ला घेतो आहे. आज टीका करणारे सुद्धा काहीवेळा पवारांचा सल्ला घेत होते. त्यामुळे उद्धव ठाकरे सल्ला घेत असतील तर त्यात काय चुकीचे काय आहे, असेही उदय सामंत यावेळी म्हणाले.