ETV Bharat / state

वडिलांचे स्मारक बांधले नाही अन् निघाले राममंदिर बांधायला... नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

नारायण राणेसारखे शिवसैनिक शिवसेनेत होते, तेव्हा शिवसेना वेगळी होती. आताची शिवसेना वेगळी आहे, अशी टीका नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

author img

By

Published : Apr 12, 2019, 6:33 AM IST

Updated : Apr 12, 2019, 7:15 AM IST

नारायण राणे

रत्नागिरी - सध्याची शिवसेना ही शिवसेना नसून, लुटशेना असल्याची टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष, खासदार नारायण राणे यांनी केली. ते निलेश राणे यांच्या प्रचारार्थ रत्नागिरीतल्या जाकादेवी येथील सभेत बोलत होते. वडिलांचे अजून स्मारक बांधले नाही आणि राम मंदिर बांधायला चालला आहे, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

राणे म्हणाले, की मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी शिवसेना होती. मग मुंबईतून मराठी माणूस हद्दपार का झाला? असा त्यांनी सवाल केला. काँग्रेसच्या राजवटीत मी मंत्री होतो, त्यावेळी आम्ही मुस्लिमांनाही आरक्षण दिले. मात्र हे पांढऱ्या पायाचे सत्तेवर आले. त्यांनी आम्ही मुस्लिमाना दिलेले ५ टक्के आरक्षण काढून घेतले. मराठ्यांना आरक्षण मिळावे, असे शिवसेनेला वाटत नव्हते. कोकणात ज्या काही विकासाच्या गोष्टी झाल्या त्या मी आणल्या आहेत, असा त्यांनी दावा केला. या उद्धव ठाकरेंनी काय दिलंे, अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला. नाणार शिवसेनेने आणला आणि तेच उद्धव म्हणतात नाणार आम्ही घालविला. उद्धव काहीही करू शकत नाहीत. नारायण राणेसारखे शिवसैनिक शिवसेनेत होते, तेव्हा शिवसेना वेगळी होती. आताची शिवसेना वेगळी आहे, अशी टीका नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

नारायण राणेंची विनायक राऊतांवर टीका

बाळासाहेबांनी मला एवढी पदे दिली. शाखाप्रमुखापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत पद दिली. तुला दिली का असा सवाल विनायक राऊत यांना उद्देशून केला. येथील पुढाऱ्यांच्या आशिर्वादानेच एलईडी फिशिंग होत आहे. या खासदाराने संसदेत कोकणाचे हसे केले. धड हिंदी बोलता येत नाही, अशी टीका राणेंनी यावेळी खासदार विनायक राऊतांवर केली.

Intro:सध्याची शिवसेना ही शिवसेना नाही, लुटशेना आहे - नारायण राणे

रत्नागिरी, प्रतिनिधी

सध्याची शिवसेना ही शिवसेना नसून, लुटशेना असल्याची टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी निलेश राणे यांच्या प्रचारार्थ आज रत्नागिरीतल्या जाकादेवी इथं झालेल्या सभेत केली..
यावेळी राणे म्हणाले की मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी शिवसेना होती, मग मुंबईतून मराठी माणूस हद्दपार का झाला?
वडिलांचं अजून स्मारक बांधलं नाही आणि राम मंदिर बांधायला चालला आहे असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला.. काँग्रेसच्या राजवटीत मी मंत्री होतो, त्यावेळी आम्ही मुस्लिमांनाही आरक्षण दिल, मात्र हे पांढऱ्या पायाचे सत्तेवर आले यांनी आम्ही मुस्लिमाना दिलेलं 5 टक्के आरक्षण काढून घेतलं.. मराठ्याना आरक्षण मिळाव असं शिवसेनेला वाटत नव्हतं.. कोकणात जे काही विकासाच्या गोष्टी झाल्या त्या मी आणल्या, या उद्धव ठाकरेंनी काय दिलं.. नाणार आणला कोणी शिवसेनेने.. आणि आता उद्धवच म्हणतो मी नाणार घालवला.. उद्धव काहीही करू शकत नाही.. नारायण राणे सारखे शिवसैनिक शिवसेनेत होते तेव्हा शिवसेना वेगळी होती आणि आताची शिवसेना वेगळी आहे..अशी टीका नारायण राणे यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर केली..

विनायक राऊतांवर टीका

बाळासाहेबांनी मला एवढी पदं दिली, शाखाप्रमुखपासून मुख्यमंत्री पदापर्यंत पद दिली, शेंबड्या तुला दिली का? इथल्या पुढाऱ्यांच्या आशीर्वादानेच एलईडी फिशिंग होतेय.. या खासदाराने संसदेत कोकणाचं हसं केलं.. धड हिंदी बोलता येत नाही.. अशी टीका राणेंनी यावेळी खासदार विनायक राऊतांवर केली.

Byte -- नारायण राणे, खासदारBody:सध्याची शिवसेना ही शिवसेना नाही, लुटशेना आहे - नारायण राणेConclusion:सध्याची शिवसेना ही शिवसेना नाही, लुटशेना आहे - नारायण राणे
Last Updated : Apr 12, 2019, 7:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.