रत्नागिरी : गोवा महामार्गावरील ( Goa Highway ) परशुराम घाटात ( Parashuram Ghat ) मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने कालपासून घाटातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. आज 19 तासानंतरही ही वाहतूक बंद आहे. सुरक्षेच्या कारणास्तव घाटातील वाहतूक काल संध्याकाळपासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच- लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान पर्यायी मार्ग म्हणून चिरणी- कळंबस्ते मार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे.
मुंबई - गोवा महामार्गावरील परशुराम घाट ( Parashuram Ghat ) आता सतत धोक्याची घंटा देऊ लागला आहे. शनिवारी रात्री दरड कोसळल्याने घाट काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. चौपदरीकणासाठी येथे मोठ्या प्रमाणात डोंगर कटाई करण्यात आली आहे . त्यामुळे दरडीचा धोका अधिक वाढला असून दरडीची माती दगड रस्त्यावर येण्याचे प्रकार सलग सुरू झाले आहेत. सोमवारी पावसाचा जोर वाढताच दरडीची माती रस्त्यावर येत असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव सायंकाळी ४.३० वाजल्यापासून घाटातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पर्यायी मार्ग म्हणून कळंबस्ते चिरणी मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे. दरम्यान आजही घाटातील वाहतूक आज सकाळी 11 वाजले तरी बंद आहे. दरम्यान आजही पूर्ण दिवसभर वाहतूक बंदच राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, येत्या 4-5 दिवसांत मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघरमध्ये रात्रभर जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सखल भागात पाणीच पाणी दिसून येत होते.
कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास आणि गाढी या नद्यांची पातळी इशारा पातळीपेक्षा थोडी कमी आहे. याशिवाय जगबुडी, काजळी नदीचं पाणी इशारा पातळीच्या वरून वाहात आहे. या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणं, तसंच जीवितहानी होऊ न देणं यासाठी मुख्यमंत्र्यांनी खबरदारीचे निर्देश दिलेत.
मुंबईत 5 टीम तैनात - दरवर्षी मुंबईमध्ये पावसाळ्यात अनेक भागात पाणी तुंबत व त्यामुळे परिस्थिती निर्माण होते. मुंबईतील सायन, दादर, हिंदमाता परिसर या भागात मोठ्या प्रमाणात दरवर्षी पाणी साचत. तर, उपनगराचे अनेक भागात देखील अशीच समस्या पाहायला मिळते. त्यासोबतच अनेक वेळा मुंबईत दरड कोसळण्याच्या घटना देखील घडत असतात. यात मोठ्या प्रमाणात जीवित हानी होते. (Maharashtra Rain Update ) त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह उपनगरात खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफच्या एकूण पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. ( Mumbai Heavy Rain )
नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली - कोकणात मुसळधार पावसाने जोरदार बॅटिंग केली असून अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच चिपळूणच्या परिस्थितीकडेही लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. राज्यात सोमवारी सकाळपासून पाऊस कोसळत आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे काही नद्यांनी इशारा पातळी गाठली असून खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ( Maharashtra Rain Update ) कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडे कमी आहे. याशिवाय जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत असल्याने या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणे, प्रसंगी त्यांना हलविणे तसेच जीवितहानी होऊ देऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागाना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. चिपळूण येथील परिस्थितीकडेही सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि नागरिकांना वारंवार सूचना देऊन त्यांना सावध ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. ( Mumbai Heavy Rain )
हेही वाचा - Mumbai Rain : मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस, राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा