रत्नागिरी - जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावरील वाशिष्ठी नदीच्या रखडलेल्या पुलाचे काम फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन नवीन ठेकेदाराने दिले आहे. अशी माहिती रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी गुरुवारी चिपळूणमध्ये दिली.
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने या रस्त्याची सध्या दुरवस्था झाली असून, महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यात पुलांची कामेही रखडली आहेत. या सर्व स्थितीची खासदार विनायक राऊत यांनी गुरुवारी पाहणी केली. चिपळूणपासून त्यांनी ही पाहणी केली, यावेळी त्यांच्यासोबत महामार्गाचे अधिकारी, ठेकेदार उपस्थित होते.
हेही वाचा - पावसामुळे आंबा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता; आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत
चिपळूणमधून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावर सध्या खड्डेच खड्डे आहेत. दरम्यान 7 दिवसांच्या आत चिपळूण परिसरातील खड्डे बुजवणार असल्याचे आश्वासन ठेकेदाराने दिले असल्याची माहिती खासदार राऊत यांनी यावेळी दिली. तसेच रखडलेल्या पुलांची कामे आता नवीन ठेकेदारांना देण्यात आली आहेत. तर, वाशिष्ठी नदीवरील पूलही फेब्रुवारी अखेर पूर्ण करणार असल्याचे आश्वासन नवीन ठेकेदाराने दिले आहे, मात्र आम्ही त्याला 15 मार्च पर्यंत मुदत दिली असल्याचे खासदार राऊत यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - दाभोळ खाडीमध्ये पुन्हा एकदा मृत माशांचा खच; मासेमारी व्यवसाय धोक्यात