रत्नागिरी - माझ्या जीवाचे काही बरे-वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल, अशी प्रतिक्रिया भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी दिली आहे. राज्य सरकारने त्यांची सुरक्षा काढली या निर्णयावर ते बोलत होते. रत्नागिरी येथे नर्सिंग कॉलेजच्या मुलींच्या वसतीगृहाचे उद्घाटन खासदार राणे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
मुंबई पोलिसांनी मला दिली होती सुरक्षा
राणे म्हणाले, राज्य सरकारने माझी सुरक्षा कालच (रविवारी) काढली. आता मला केंद्र सरकारची सुरक्षा आहे. 23 व्यक्तींपासून माझ्या जीवाला धोका आहे. म्हणून मुंबई पोलिसांनी मला सुरक्षा दिली होती. ती या लोकांनी काढली. झेड प्लस सुरक्षेवरुन माझी सुरक्षा इथवर आली आहे. त्यामुळे माझी कुठली तक्रार नाही.
सुरक्षा पक्ष देत नाही तर सरकार देते
महाराष्ट्र सरकार हे एका पक्षाचे नाही. सुरक्षा ही पक्ष देत नाही तर सरकार देते. धोका असलेल्या व्यक्तीचे संरक्षण करणे सरकारची आणि पोलिसांची जबाबदारी असते, असेही राणे यावेळी म्हणाले.
हेही वाचा - जैतापूरच्या आगीमध्ये आंब्याची अनेक झाडे जळून खाक
हेही वाचा - दापोलीत कावळे आढळले मृतावस्थेत, 'बर्ड फ्लू'च्या भितीमुळे परिसरात खळबळ