रत्नागिरी - जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आणि नाणार रिफानरीच्या विरोधामुळे चर्चेत आलेले राजापूरचे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. राजापूर विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून अन्य 5 उमेदवार इच्छुक आहेत. मात्र, यावेळी सुद्धा राजन साळवी यांनाच पक्ष पुन्हा संधी देण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्कालीन भांडारपालासह चौघांवर गुन्हा दाखल
मंगळवारी आमदार राजन साळवी यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन मुंबईत करण्यात आले. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व शिवसेना सचिव, शिवसेना लोकसभा गटनेते व रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार राजन साळवी यांच्या सन 2014 ते 2019 या कार्यकाळातील 'विधानसभा कामकाजाचा लेखाजोखा' कार्यअहवालाचे प्रकाशन करण्यात आले. मातोश्रीवर या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.
हेही वाचा - सिंधुदुर्गमधील बड्या राजकीय नेत्याची रिफायनरी प्रकल्प परिसरात 300 एकर जमीन, विनायक राऊतांचा गौप्यस्फोट
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख जगदिश राजापकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख जया माने, संगमेश्वर तालुका संपर्कप्रमुख राजेश शेलार, लांजा तालुका प्रमुख संदीप दळवी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते..