रत्नागिरी - ८ जुलैला विधानसभेत ( Assembly ) झालेल्या निवडीप्रसंगी व्हीपच्या विरोधात मतदान ( Voting ) केल्यामुळे मला शिंदे गटाच्या त्यांनी निर्माण केलेले प्रतोद भरत गोगावले यांनी पत्र पाठवलेलं आहे. तुम्हाला अपात्र का करण्यात येऊ नये, अशी नोटीस ( Notice ) दिली आहे. याची आम्हाला परवा नाही. आमदारकी गेली, तरी चिंता नाही. ती बाळासाहेबांच्या ( Balasaheb Thackeray ) चरणाशी अर्पण करतो, असे शिवसेना ( Shivsena ) उपनेते आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेच्या रत्नागिरीतील निर्धार मेळाव्यात म्हटले आहे.
हा जिल्हा सेनेचा बालेकिल्ला - दरम्यान रत्नागिरी तालुका, जिल्हा हा सेनेचा ( Shivsena ) बालेकिल्ला आहे. या ठिकाणी सेना रुजली आहे. युती तुटली, तो धक्का होता. उदय सामंत 2014 मध्ये सेनेत आले होते. सेनेचा मुख्यमंत्री ( CM ) होणार, हे डोक्यात ठेवूनच सेनेचा एक आमदार ( MLA ) म्हणून सामंत आमदार झाले. पुढे ते म्हाडा अध्यक्ष, उपनेते आणि कॅबिनेट मंत्रीही झाले होते. यावेळी माझ्यावर अन्याय झाला, पण निष्ठा शिवसेनेशी आहे. गेल्या 20 दिवसात अनेक राजकीय घडामोडी घडल्या, पण मी सेनेशी प्रामाणीकच असल्याचे ते यावेळी म्हणाले.
शिवसेना हा केवळ राजकीय पक्ष नाही. हि विचारांची चळवळ - वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार पुढे घेवून जाणारी हि चळवळ आहे. त्यामुळे ती कधीही संपणार नाही. बाळासाहेबांचे विचार नेते, लोकप्रतिनिधी नव्हे तर सर्वसामन्य शिवसैनिक पुढे घेवून जात आहे. त्यामुळे शिवसेना संघटन दिवसेंदिवस अधिकच मजबूत होत जाईल असा विश्वास साळवी ययांनी व्यक्त केला. कोण इकडचा तिकडे गेला म्हणून शिवसेने संपत नसते. शिवसेना हा विचार ग्रामीण भागासह तळागाळात रुजलेला आहे. जिल्ह्यात संघटना मजबूत आहे. हा बालेकिल्ला आजही आहे ( Ratnagiri was Shiv Senas stronghold ) ) उद्याही राहिल.
संघटन बांधणी करणे हे शिवसैनिकांच्या रक्तात - त्यामुळे संघटनेची बांधणी कायम सुरुच असते.ती नव्याने करण्याची आवश्यकता नाही.जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचा विश्वास आमदार साळवी यांनी व्यक्त केला. अप्पा साळवी, अण्णा सावंत, राजन सावंत, शिरिष जैतपाल, सतिश नाईक, प्रमोद शेरे यांच्या सारख्या शिवसेनेशी निष्ठावांन शिवसैनिकांनी जिल्ह्यात पक्षाची पाळेमुळे रुजवली आहे. त्याचे बोट धरुन मी शिवसेनेत आलो. पक्षाने मला नगरसेवक, नगराध्यक्ष,जिल्हा प्रमुख, आमदार केले. आता तर पक्ष प्रमुख ना.ठाकरे यांनी उपनेते पदाचा सोनेरी मुकूट डोक्यावर बसवला आहे. हे केवळ शिवसेनेतच होवू शकते हे जनतेसमोर आल्याचे आ. साळवी यांनी सांगितले.