ETV Bharat / state

Anil Parab On ST Workers Strike : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर यापुढे होणार तीव्र कारवाई - मंत्री अनिल परब - ST Employees Strike

सरकार एसटी कर्मचाऱ्यांप्रमाणे जनतेही बांधिल आहे. त्यामुळे यापुढे आता कारवाई तीव्र केली जाईल, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब ( Anil Parab On ST Workers Strike ) यांनी एसटी संपावर ( ST Employees Strike ) बोलताना दिला आहे. न्यायालयाने अवमान याचिकेची नोटीस प्रत्येक एसटी डेपोत लावण्यास सांगितली आहे. याचा अर्थ न्यायालयाने आम्हाला कारवाई करण्याचे संकेत दिल्याचेपी यावेळी परब म्हणाले. ते रविवारी (दि. 26) रत्नागिरीत बोलत होते.

मंत्री अनिल परब
मंत्री अनिल परब
author img

By

Published : Dec 26, 2021, 10:33 PM IST

Updated : Dec 26, 2021, 10:45 PM IST

रत्नागिरी - सरकार एसटी कर्मचाऱ्यांप्रमाणे जनतेही बांधिल आहे. त्यामुळे यापुढे आता कारवाई तीव्र केली जाईल, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब ( Anil Parab On ST Workers Strike ) यांनी एसटी संपावर ( ST Employees Strike ) बोलताना दिला आहे. न्यायालयाने अवमान याचिकेची नोटीस प्रत्येक एसटी डेपोत लावण्यास सांगितली आहे. याचा अर्थ न्यायालयाने आम्हाला कारवाई करण्याचे संकेत दिल्याचेही यावेळी परब म्हणाले. ते रविवारी (दि. 26) रत्नागिरीत बोलत होते.

बोलताना मंत्री अनिल परब

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत मंत्रीमंडळाने राज्यापालांना ( Governor Of Maharashtra ) प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे आता चेंडू राज्यपालांच्या कोर्टात आहे. 28 डिसेंबरला निवडणूक घ्यावी, असे या प्रस्तावात म्हटले आहे. हात उंचावून आणि आवाजी मतदानाने, असा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत केल्याचेही परब यांनी रत्नागिरी येथे बोलताना म्हटले आहे. दरम्यान, मला सीबीआयकडून कोणतीही नोटीस प्राप्त झालेली नाही. या संदर्भातील बातम्या कोण पुरवते हे मला माहीत नसल्याचे परब म्हणाले.

...तोपर्यंत निवडणुका नको, असा सरकारचा मानस

ओबीसी आरक्षणासंदर्भात सरकार सोमवारी (दि. 27) अधिवेशनात ( Maharashtra Assembly Winter Session 2021 ) ठराव करत आहे. जोपर्यंत इंम्पिरिकल डाटा जमा होत नाही तोपर्यंत निवडणुका नको, असा सरकारचा मानस आहे, असे स्पष्ट मत संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी रत्नागिरी येथे बोलताना व्यक्त केले आहे.

सोमैया यांना शंभर कोटी द्यावे लागलतील किंवा माफी मागावी लागेल

किरिट सोमैयांच्या बोलण्याचे मला काहीही फरक पडत नाही. मी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांना 100 कोटी द्यावे लागतील किंवा माझी माफी मागावी लागेल, असे परब यांनी म्हटले आहे. शिवाय, तो रिसॉर्ट हा सदानंद कदम यांचा असल्याचा उल्लेखही परब यांनी केली आहे.

कदम वरिष्ठ नेते

रामदास कदम ( Ramdas Kadam ) सध्या आक्रमक झाले आहेत. त्यावर विचारले असता परब यांनी कदम माझे वरिष्ठ नेते आहेत, असे सांगत कदम यांच्या मुद्यावर बोलणे पुन्हा एकदा टाळले आहे.

हे ही वाचा - Ajit Pawar In Ratnagiri : कुणी कोंबड्याला मांजर करतंय, तर कुणी मांजराला कोंबडा करतंय.. अजित पवारांनी राणे, मलिकांना सुनावले

Last Updated : Dec 26, 2021, 10:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.