ETV Bharat / state

नाणारमध्ये रिफायनरी नाहीच! मंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

author img

By

Published : Mar 13, 2021, 4:50 PM IST

Updated : Mar 13, 2021, 7:01 PM IST

मी सुरुवातीपासूनच सांगत होतो की नाणारमध्ये रिफायनरीचा विषय हा संपलेला आहे. ज्या लोकांनी मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांचे ऐकून मागच्या सरकारमध्ये नाणारमध्ये होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प रद्द केला होता ते विरोधामध्ये बसल्यानंतर नाणारमध्येच रिफायनरी प्रकल्प व्हावा, अशी मागणी व काही गोष्टी घडत होत्या त्या चुकीच्याच होत्या.

minister uday samant
मंत्री उदय सामंत

रत्नागिरी - ज्या लोकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ऐकून मागच्या सरकारमध्ये राजापूर तालुक्यातील नाणारमध्ये होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प रद्द केला होता. ते विरोधामध्ये बसल्यानंतर नाणारमध्येच रिफायनरी प्रकल्प व्हावा, अशी मागणी करू लागले आहेत. या गोष्टी चुकीच्या घडत होत्या. मात्र, नाणार रिफायनरीचा विषय आता संपला आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. ते आज (शनिवारी) रत्नागिरीत बोलत होते.

मंत्री उदय सामंत माध्यमांशी संवाद साधताना.

आम्ही स्थानिकांसोबत -

मी सुरुवातीपासूनच सांगत होतो की नाणारमध्ये रिफायनरीचा विषय हा संपलेला आहे. ज्या लोकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ऐकून मागच्या सरकारमध्ये नाणारमध्ये होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प रद्द केला होता ते विरोधामध्ये बसल्यानंतर नाणारमध्येच रिफायनरी प्रकल्प व्हावा, अशी मागणी व काही गोष्टी घडत होत्या. त्या चुकीच्याच होत्या. तेथील लोकांचा जर पाठिंबा असता तर आमचे काहीच म्हणणे नव्हते. मात्र, स्थानिकांच्या विरोधाला सामोरे जात असताना शिवसेनेची ही भूमिका होती, स्थानिकांबरोबर आम्ही राहू आणि म्हणून तेथील रिफायनरी रद्द झालेली आहे.

हेही वाचा - धक्कादायक! ऐन कोरोनाच्या काळात कळंबमध्ये बनावट औषधांची विक्री

त्यानंतरच त्यावर बोलणे उचित ठरेल - सामंत

आता माझ्या मतदरासंघात जयगडला रिफायनरी येत आहे. किंवा तळ्याला रिफायनरी जात आहे. याबाबत आपल्याला काही माहिती नाही. मात्र, रिफायनरीच्या बाबतीत तिथल्या लोकांचे समर्थन असेल, ती लोक जर रिफायनरी स्विकारत असतील तर त्याठिकाणी प्रकल्प सुरू करू, असे स्वतः मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. त्यामुळे त्याबाबतही कुणी राजकारण करू नये. तसेच ज्यावेळी रिफायनरीची जागा फायनल ठरेल त्यानंतरच त्यावर बोलणे उचित ठरेल, असेही मंत्री सामंत म्हणाले.

हेही वाचा - बुलडाण्यात संपूर्ण लॉकडाऊन नाही, निर्बंधांसह दुकाने राहतील सुरू

Last Updated : Mar 13, 2021, 7:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.